aurangpura crime
aurangpura crime 
छत्रपती संभाजीनगर

Crime News: औरंगाबादमध्ये तरुणाची भोसकून हत्या; शहरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: सोळा गुन्हे दाखल असलेल्या आणि एकदा तडीपारीची कारवाई झालेल्या गुन्हेगाराचा औरंगपुरा भागातील पिया मार्केट येथे खून झाला. ही घटना गुरूवारी (ता. 15) रात्री दहाच्या सुमारास घडली. यात एकोणीस वर्षीय तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. अशी माहिती पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे यांनी दिली.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, समीर खान सिकंदर खान (वय 27, रा. टाऊन हॉल) असे मृताचे नाव आहे. एका दारूच्या दुकानात समीर आणि त्याचा साथीदार दारू पिण्यासाठी औरंगाबादेतील मार्केटमध्ये रात्री गेले होते. तेथून परतत असताना एकोणीस ते वीस वर्षीय तिघे दुचाकीवरून आले. त्यांची आणि समीरमध्ये गाडीचा धक्का लागल्या वरून बाचाबाची सुरु झाली. वाद वाढून तिघांपैकी एकाने समीरच्या उजव्या पायाच्या मांडीवर वार केला. यात रक्तस्त्राव होऊन सिकंदर याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर गुन्हे शाखा, सिटीचौक पोलिसांनी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी संशयीत तिघांना ताब्यात घेतले. शहरात गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी पोलिस यंत्रणा मोठी कारवाई करत असल्याचे दिसत आहे. पण तरीसुध्दा शहरात विविध भागात गुन्हे वाढताना दिसत आहेत. शहराच्या बऱ्याच भागात किरकोळ कारणांवरून वाद, तंटे होताना दिसत आहेत. त्याचेच नंतर मोठ्या गुन्ह्यात रुपांतर होत आहे.


"समीरवर सोळा गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर तडीपारीची एकदा कारवाईही झाली होती. त्याच्या खून प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे."

- निकेश खाटमोडे, पोलिस उपायुक्त.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT