English medium school Sell Fraud
English medium school Sell Fraud sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शाळा विकायची म्हणत १६ लाखांचा चुना

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवीत इंग्रजी माध्यमाची शाळा विक्री करावयाची आहे, असे सांगून संशयिताने करारपत्र करून एका शिक्षण संस्थाचालकांची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात सिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वनाथ माधवराव तरटे (५५, रा. कमलेश हाउसिंग सोसायटी, एन-६, सिडको) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संस्था चालक डॉ. अफसर खान जुम्मा खान (७१, रा. रोशनगेट, आजम कॉलनी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ते विंचेस्टर इंटरनॅशनल स्कूल चालवितात. त्यांना आणखी एका शाळा चालविण्यास हवी होती. दरम्यान त्यांनी विश्वानाथ माधवराव तरटे (रा.एन-६, सिडको) यांना शाळेबद्दल कल्पना दिली. त्याचवेळेच तरटे याने ‘आपल्याकडे गौतम ऋषी शिक्षण संस्था व अश्वघोष शैक्षणिक व व्यायाम प्रसारक मंडळ, एन-१ सिडको शिक्षण संस्था असल्याचे सांगितले.

दरम्यान, तरटे याने खान यांना आपण अश्वघोष शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष असल्याची थाप मारली. तसेच संस्थेअंतर्गत सिडकोत स्प्रिंगडेल प्रायमरी इंग्लिश स्कूल असून ती शाळा आपणास चालविण्यास देऊ शकतो, असेही तरटे म्हणाला. विश्वासाच्या दोन चार गोष्टी झाल्यानंतर तरटेने २१ लाख रुपयांचा व्यवहार ठरविला. त्यानुसार २०१४ मध्ये १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर करारपत्रही केले. त्यानंतर खान याच्याकडून धनादेशाद्वारे १६ लाख रुपये घेतले. परंतु शाळा हस्तांतरित केलीच नाही. इतकेच नव्हे तर थापा मारत वेळोवेळी आज उद्या देतो म्हणत विश्वास संपादन केला.

परंतु खान यांनी खोलवर माहिती काढत शिक्षण संस्थेची माहिती काढली असता, तरटे हा अश्वघोष शैक्षणिक संस्थेचा ना अध्यक्ष होता, ना सदस्य होता. याशिवाय तरटे याने खान यांना सांगितल्यानुसार दुसऱ्या एका संस्थेचा अध्यक्ष होता. परंतु त्यासंदर्भातही माहिती काढली असता, तो अध्यक्ष नसून कोषाध्यक्ष असल्याचे स्पष्ट झाले. तरीही तो आज उद्या पैसे परत या आशेवर खान यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही, परंतु अनेकवेळा पैसे मागूनही देत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे डॉ. खान यांनी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदवला. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT