covaxin sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद कोवॅक्सीन लसीचा संपला साठा

हजारो विद्यार्थांची संपली मुदत; आज पुरवठ्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सीन लसीचा १५ ते १८ वयोगटातील डोस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, अवघ्या काही दिवसांतच कोवॅक्सीन लसीचा साठा संपला. सोमवारी (ता. १४) रात्री लसीचा साठा मिळाला तर मंगळवारी (ता. १५) लसीकरण होऊ शकेल, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर १५ ते १९ वयोगटातील तरुणांना लसीकरण सुरू करण्यात आले होते. शहरातील ७० हजार मुलांना डोस देण्याचे महापालिकेला उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातील ४० हजार १०७ मुलांनी पहिला डोस घेतला आहे. त्याची टक्केवारी ५७ एवढी आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या १३ हजार ५०० एवढी आहे. त्याची टक्केवारी १९ एवढी आहे.

मुलांना लस देण्याचा निर्णय झाल्यानंतर महापालिकेकडे कोवॅक्सीन लसीचा मोठा साठा होता. त्यामुळे शाळांच्या मागणीनुसार शिबिर घेऊन लसीकरण करण्यात आले. कोवॅक्सीन लसींच्या दोन डोसमधील अंतर २८ दिवसांचे आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्यांची मुदत संपली आहे. असे असताना महापालिकेकडील लसीचा साठा संपला आहे. सोमवारी महापालिकेकडे ७८० लस होत्या. त्या केंद्रावर वाटप करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत लस मिळाली तर मंगळवारी लसीकरण होऊ शकते, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

कोविशिल्डचा मुबलक साठा

कोवॅक्सीन लसीचा साठा संपला असला तरी कोविशिल्ड लसीचा साठा मुबलक प्रमाणात असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. सुमारे ६८ हजार कोविशिल्ड लस आहेत. त्यामुळे कोविशिल्ड लसीचे लसीकरण सुरू राहील, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT