underground expressway
underground expressway  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : भूमिगत `एक्स्प्रेस वे’ ची शहरात चाचपणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात विविध कंपन्यांचे केबल टाकणे, गॅसलाइन टाकण्यासाठी वारंवार रस्त्‍यांचे खोदकाम केले जाते. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. ही वारंवार होणारी रस्त्यांची तोडफोड कायमची बंद करण्यासाठी रस्त्यांच्या शेजारी मल्टी युटिलिटी अंडरग्राउंड एक्स्प्रेस वे टाकण्यासाठी महापालिकेने चाचपणी सुरू केली आहे. पंतप्रधान गतशिक्ती अभियानाअंतर्गत या प्रकल्पासाठी निधी मिळवता येईल का? यासाठी प्रयत्न सुरू असून, सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपये या प्रकल्पाचा अंदाजे खर्च असेल, असे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

शहरात सध्या दोन प्रभागांत गॅस पाइपलाइन टाकणयाचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यांच्या कडेला खोदकाम केले जात आहे. तसेच बीएसएनएलसह विविध मोबाइल कंपन्यांतर्फे शहरात लाइन टाकल्या जातात. त्यासाठी महापालिका संबंधित कंपनीकडून पैसे घेते. पण रस्त्यांचे झालेले नुकसान मोठे असते. रस्त्यांचे वारंवार होणारे नुकसान टाळण्यासाठी मल्टी युटिलिटी अंडरग्राउंड एक्स्प्रेस वेची शहरात गरज आहे. मात्र त्यासाठी मोठा निधी लागणार आहे.

पंतप्रधान गतिशक्ती अभियानाअंतर्गत यासाठी निधी मिळविता येईल का? यासाठी आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) या जागतिक बॅंकेशी संलग्न असलेल्या संस्थेच्या प्रतिनिधीसोबत चर्चा झाल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. ही संस्था कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी महापालिकेला मदत करणार आहे. तसेच या कामात कंपनीच्या निधीचा देखील वाटा असेल, असे श्री. पांडेय यांनी नमूद केले.

आठ जुलैला बैठक

शहरात मल्टी युटिलिटी अंडरग्राउंड एक्स्प्रेस वेचे जाळे तयार करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे. या अनुषंगाने आठ जुलैला ‘आयएफसी’च्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे श्री. पांडेय यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT