Aurangabad heart surgery Successful without anesthesia
Aurangabad heart surgery Successful without anesthesia sakal
छत्रपती संभाजीनगर

बेशुध्द न करता दोघांवर यशस्वी 'हृदय शस्त्रक्रिया'

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एमजीएम रुग्णालयात पहिल्यांदाच दोन रुग्णांवर बेशुध्द न करता यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. मराठवाड्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती हृदयरोग शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. योगेश बेलापूरकर, हृदयरोग भूलतज्ज्ञ डॉ. नागेश जंबुरे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यात एका ७५ वर्षीय रुग्णावर आणि ३३ वर्षीय महिला रुग्णावर एमजीएम रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. ७५ वर्षीय रुग्णास मधुमेह, रक्तदाब आणि अतिधूम्रपानामुळे फुप्फुसाचा आजार होता. रुग्णाची अँजिओप्लास्टी झालेली होती. आता पुन्हा रक्तवाहिन्यांमध्ये गाठी आढळल्या होत्या.

तर महिला रुग्णास जन्मत: हृदयातील छिद्रामुळे फुप्फुसावर दाब वाढला होता. फुप्फुसाचा आजार असेल तर हृदय शस्त्रक्रिया करताना पूर्णपणे भूल दिल्यास जोखीम वाढते. त्यामुळे पाठीच्या कण्यात ठरावीक मज्जारज्जूंवर भुलीचे इंजेक्शन देऊन या दोन्ही रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकारच्या भुलीत रुग्ण पूर्णपणे जागे होते. स्वत: श्वास घेत होते, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉ. बेलापूरकर, डॉ. जंबुरे यांच्यासह डॉ. सुहृद अन्नछत्रे, डॉ. अजिता अन्नछत्रे, डॉ. रीम रॉय, डॉ. प्रदीप बिसेन, डॉ. जुबेर खान, डॉ. विजय व्यवहारे, योगेश चव्हाण, अनिल माळशिखरे, अपेक्षा कोठावदे, वैशाली राऊत आदींनी शस्त्रक्रियेच्या यशस्वितेसाठी प्रयत्न केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT