Aurangabad increase asthma patients due air pollution sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : वाढत्या प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांत वाढ

श्वसनमार्ग व फुफ्फुसांशी संबधीत आजार आसल्यामुळे दम्याला गांर्भियाने घेतले पाहिजे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अस्थमा (दमा) हा श्वसनमार्ग व फुफ्फुसांशी संबधीत आजार आहे. त्यामुळे दम्याला गांर्भियाने घेतले पाहिजे. योग्य उपचार नसल्यामुळे हा आजार जीवघेणा ठरु शकतो. सध्या वाढत्या प्रदुषणामुळे दम्याचे रुग्ण वाढत असल्याची खंत शहरातील दमा,क्षय व अॅलर्जी तज्ज्ञांनी व्यक्त केली.

दरवर्षी मेच्या पहिल्या मंगळवारी जागतिक अस्थमा दिन साजरा केला जातो. यंदा ३ मे रोजी हा दिन साजरा करण्यात आला. दमा सारख्या आजाराविषयी जनजागृती निर्माण करणे, हा यामागचा उद्देश आहे. यानिमित्ताने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील दमा, क्षय व अॅलर्जी डॉ. सचिन जोशी व डॉ. हाफीज देशमुख यांनी वरील माहिती दिली.

डॉ. जोशी म्हणाले, की रात्री वा पहाटे अधिक खोकला येणे, दम लागणे, श्वास गुदमरल्यासारखे होणे, बोलण्यास त्रास होणे ही दम्याची सुरुवातीचे लक्षणे आहेत. वेळी तज्ज्ञांचा सल्ला व योग्य उपचारामुळे हा आजार नियंत्रणात ठेवता येतो, असेही त्यांनी नमूद केले. तर डॉ. देशमुख म्हणाले, की दमा झाला, आता इन्हेलर कायम सुरू राहणार, ते शरीरासाठी चांगले नसते असा गैरसमज आहे. त्यामुळे अनेकदा गोळ्यांची मागणी होते. परंतु प्रत्यक्षात दम्यावरील गोळ्यांमुळे शरीराच्या इतर अवयवांना धोका पोचण्याचा संभव जास्त असतो. पंप वापरल्याने औषध थेट फुफ्फुसापर्यंत पोचते, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT