Aurangabad inflation Thinner 130 per liter increase price in paint
Aurangabad inflation Thinner 130 per liter increase price in paint sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पेट्रोल-डिझेललाही थिनरने टाकले मागे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : लॉकडाउननंतर महागाईचा चांगलाच भडका उडाला आहे. यामुळे खाद्यतेलापासून ते इंधनाच्या दरवाढीचा भडका आहे. रंग, इतर गोष्टींसाठी लागणाऱ्या थिनरच्या किमतीने इंधनच्या किमतींनाही मागे टाकले आहे. लॉकडाउन काळात थिनरचे दर तीन वेळा वाढले. सध्या थिनर १३० रुपये लिटरने विक्री होत आहे. रंगाच्या किमतीही ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे सरचिटणीस शिवशंकर स्वामी यांनी दिली.

जिल्ह्यात थिनरची अडीचशे ते तीनशे दुकाने आहेत. दर महिन्याला शहरात ६ हजार लिटर थिनर लागते. दरवाढीमुळे घराला रंग लावणे आता सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. यामुळे ग्राहकही खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. सध्या पेट्रोल ११२ ते ११३ रुपये तर डिझेल हे शंभर रुपयांपर्यंत विक्री झाले.

तर थिनर हे १३० रुपयांनी विक्री होत आहे. वास्तविक पाहता पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत थिनर हे लो ग्रेड असते आणि त्याचे दर मात्र जास्त आहे. यावर आजपर्यंत कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही. नेमके या बाबतीत पाणी कुठे मुरत आहे याकडे सरकारने लक्ष द्यावे एवढीच माफक अपेक्षा विक्रेत्यांतर्फे व्यक्त केली जात आहे.

पेंट (रंग विक्री) चा व्यवसाय सुरू करून करोडो रुपयांची गुंतवणूक, दुकानाचे भाडे, नोकराचा पगार, लाइट बिल महापालिकेचे टॅक्स आणि इतर सरकारी टॅक्स हे भरताना व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत, पेंट व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले आहे. यामुळे थिनर विक्रीपेक्षा पर्यायी व्यवस्था बघत आहेत. व्यवसाय नफा कमी आणि गुंतवणूक जास्त असल्याने बँकेचे हप्ते आणि बाजारपेठेत अडकलेल्या उधारीच्या त्रासामुळे अनेकजण दुकाने बंद करीत असल्याचेही शिवशंकर स्वामी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT