crime
crime Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पोलिस निरीक्षकांवर चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पोलिस निरीक्षकांवर नुकत्याच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोलिस नाईकाने चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जिन्सी पोलिस ठाण्यात घडली. यात पोलिस निरीक्षक व्यंकटेश एम. केंद्रे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. आरोपीस पोलिसांनी तात्काळ बेड्या ठोकल्या असून मुजाहेद शेख (अंदाजे ४८) असे हल्लेखोराचे नाव आहे. हल्लेखोर शेख याने केंद्रे यांच्या पोटावर चाकूने दोन गंभीर वार केल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

निरीक्षक केंद्रे हे ठाण्यात गेल्यानंतर तिथे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम असल्याने ते पार्किंग परिसरातच उभे होते. त्याचवेळी आरोपी मुजाहेद शेख तेथे आला. त्यांच्यात कुठल्या तरी विषयावरून संभाषण सुरू झाले. त्यानंतर त्याने अचानक केंद्रेंवर चाकूहल्ला केला. शेखने दोनवेळा त्यांच्या पोटात आणि छातीत चाकू खुपसला. आरडाओरड झाल्यानंतर इतर अधिकारी, कर्मचारी जमा झाले. त्यांनी शेखला रोखले. केंद्रे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गीते, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त डॉ. निशिकांत भुजबळ, गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी भेट दिली. रुग्णालयात अर्ध्या तासातच रक्ताच्या तीन बॅग्ज चढविल्या गेल्या होत्या.

मुजाहेद शेख हा पोलिस नाईक पदावर होता. दोन तीन महिन्यापूर्वी शहर पोलिस दलात झालेल्या बदल्यात त्याचीही बदली जिन्सीतून बेगमपूरा पोलिस ठाण्यात झाली होती. मात्र त्याने त्याही अगोदरपासूनच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता, सदर अर्ज नुकताच म्हणजे ५ जून रोजी मंजूर झाल्याची माहिती आहे. आरोपी मुजाहेद हा नेहमी नशेत असतो. त्याने २००४-०५ सालादरम्यान विशेष शाखेचे निरीक्षक सोपान बोरसे यांच्यावरही अशाच प्रकारचा हल्ला केला होता. त्यानंतर त्याला डिसमिसही करण्यात आले होते. मात्र त्याने कोर्टात धाव घेतली होती. साधारण तीन ते चार वर्षानंतर पुन्हा तो पोलिस दलात आला होता.

हल्ल्याचे असू शकते हे कारण

साधारण वर्षभराच्या अंतरात जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रारदार फिर्याद देण्यासाठी आले होते. त्यादरम्यान आरोपी शेख हा ठाण्यातील पीएसओला सहायक म्हणून काम करत असे. तक्रारदार फिर्याद लिहून देत असताना नशेत तर्र असलेल्या शेख याने तक्रारदाराला ऐकून न घेता थेट ठाण्यातच आरडाओरडा करत शिवीगाळ केली होती, दरम्यान आरडा ऐकून निरीक्षक केंद्रे यांनी तक्रारदारांशी चांगले वागा असे म्हणत दम भरला होता. त्याचवेळी तक्रारदारांसमोरच आपल्याला तुम्ही मला का झापले असे म्हणत तो निरीक्षकांवर ‘गरम’ झाला होता. शिवाय कारणांचा ’डिफॉल्ट रिपोर्ट’ वरिष्ठांना पाठविल्याचा रागही आरोपी शेखच्या मनात होता, त्यातूनच त्याने केंद्रे यांच्यावर हल्ला केला असावा असे पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT