girl boy left home Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

आई रागावल्याने १७ वर्षीय मुलीने प्रियकरासोबत सोडले घर; दोघांना समुपदेशनानंतर पाठविले घरी 

रामराव भराड

वाळूज (औरंगाबाद): आई-वडील रागावल्याने १७ वर्षीय मुलगी २० वर्षीय प्रियकरासह वाळूज औद्योगिक परिसरात आली. ते खोली घेऊन एकत्र राहणार होते. याचदरम्यान त्यांच्यावर दामिनी पथकाची ‘नजर’ पडली. त्यानंतर विचारपूस करून दामिनी पथकाने त्यांचे व आई-वडिलांचे समुपदेशन केले. नंतर त्यांना सुखरूप घरी पाठविले.

देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सतरा वर्षीय मुलगी आई रागावली म्हणून वीस वर्षीय अल्पवयीन प्रियकराला घेऊन वाळूज औद्योगिक वसाहतीत आली. परिसरात आपण काहीतरी कामधंदा करू व येथेच राहु, असा विचार करीत ते खोली किरायाने शोधत रांजणगाव (शेणपुंजी) येथे आले. ते खोली घेण्याच्या प्रयत्नात होते.

त्याचवेळी दामिनी पथक जोगेश्वरी येथील एका अपहरण प्रकरणाच्या शोधार्थ जात होते. या पथकाची नजर त्यांच्यावर पडली. अल्पवयीन मुलगा व मुलगी संशयास्पदरित्या आढळल्याने त्यांनी त्यांना विश्वासात घेत विचारपूस केली असता अल्पवयीन मुलीने सर्व काही सांगून टाकले. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असून तेथील पोलिस अधिकार्‍यांशी बोलून दोन्हींची माहिती दिली. ते आल्यानंतर दामिनी पथकाने या मुलीच्या आईवडिलांचे समुपदेशन करून गुरुवारी (ता.१८) त्यांना त्यांच्या स्वाधीन केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त मीना मकवाना, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र साळोखे, दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड, महिला पोलीस हेडकाँस्टेबल रेखा चांदे, महिला पोलीस अंमलदार हिरा चिंचोळकर, ए. एस. गायकवाड, गिरीजा आंधळे यांच्या पथकाने केली. 

घरचे देणार होते लग्न लावून 
सतरा वर्षीय मुलगी पुणे येथील देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिच्या मोठ्या बहिणीचे अल्‍पवयीन असतानाच लग्न झाले. या १७ वर्षीय मुलीचेही लग्न लावून देण्याचे प्रयत्न सुरू होते. अशातच आई रागावली त्यामुळे ही मुलगी रागात होती. दरम्यान बुलढाणा येथील वीस वर्षे मुलगा कामधंदा करून जवळच रहात होता. या दोघांचे सुत जमलेले होते. त्यामुळे सतरा वर्षीय मुलगी व वीस वर्षीय मुलगा वाळूज परिसरात आले. काहीतरी काम धंदा करून आपण येथेच राहू, या उद्देशाने हे दोघे खोली किरायाने घेण्याच्या शोधात होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT