Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईसाठी कृषीमंत्री भुसेंचा अधिकाऱ्याला फोन, पंचनाम त्वरित करण्याचे दिले आदेश

संजय जाधव

कन्नड : तालुक्यात मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार उदयसिंग राजपूत यांनी मंगळवारी (ता.२३) कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे मुंबईत केली आहे. दरम्यान, आमदार राजपूत यांनी कन्नड तालुक्यातील अवकाळी पाऊस व गारपीट या बाबत माहिती दिली. गतवर्षी खरीप हंगामात कन्नड तालुक्यात पडलेल्या बेसुमार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

हा आघात ताजा असताना आता पुन्हा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदे, कांदे बीजवाई, आंबे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी, अशी मागणी श्री. राजपूत यांनी केली. यानंतर मंत्री श्री. भुसे यांनी तत्काळ औरंगाबाद येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना फोन करून त्वरित शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून भरपाई देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती देण्यात आली.


तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक म्हणाले, कन्नड तालुक्यात करंजखेड व चिंचोली महसूल मंडळात १ हजार २०४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सदर पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, त्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. सदरील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (एनडीआरएफ)दोघांकडून मदत मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला नाही, त्यांना एनडीआरएफकडून मदत मिळेल.

अशी मिळेल मदत
पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना, पिकविम्यातील नियमाप्रमाणे भरपाई मिळणार आहे. तसेच पीकविमा भरलेल्या व न भरलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ६ हजार तर बागायती पिकासाठी हेक्टरी १२ हजार ५०० तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजारांची मदत मिळणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT