lpg gas
lpg gas 
छत्रपती संभाजीनगर

सांगा कसं जगायचं? महागाई-कोरोनाने पिचला ग्रामीण भाग

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद: स्वयंपाक करताना गोरगरीब महिलांच्या डोळ्यातून येणारे पाणी केंद्र शासनाला बघवत नसल्याचे सांगत मोठी जाहिरात बाजी करीत महिलांना उज्वला योजने अंतर्गत माफक दरात गॅस कनेक्शन दिले होते. तर दुसरीकडे त्यानंतर रॉकेल बंद केले होते. आता मात्र गोरगरिबांना गॅस दरवाढीमुळे स्वयंपाकाच्या गॅस परवडत नाही. एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना महागाई नागरिकांच्या मुळावर उटली आहे.

उज्वलाने रोकी नेले तर महागाईने गॅस हिरावला अशी म्हणण्याची वेळ ग्रामीण भागातील महिलांवर आली आहे. शासनाच्या उज्वला योजने अंतर्गत कमी दरामध्ये महिलांना गॅसचे कनेक्शन दिले होते. आता गॅस दरवाढीमुळे गॅस भरण्यासाठी 850 ते 900 रुपये खर्च येतो. ग्रामीण भागामध्ये मजुरी करून पोट भरणे कठीण झाले आहे, त्यात वाढती महागाई असल्याने ग्रामीण भागातील महिलांना गॅस भरणे कसं परवडेल?

त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना चुलीवरच स्वयंपाक केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती फर्दापूरसह परिसरातील महिलांवर आली आहे. कमाई चांगली असणाऱ्या काही कुटुंबातही चहा व इतर छोट्या गोष्टी गॅसवर केल्या जातात, तर स्वयंपाक मात्र चुलीवरच होत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात रॉकेल मिळत नाही. विज खंडित झाल्यानंतर ग्रामस्थांना रात्रीच्या वेळेस शेतीची राखण करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना रॉकेलच्या दिव्यांचा प्रकाश होता आता तो देखील अंधारही हिरावून गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT