corona patients increased in kolhapur 165 new corona patients cases registered today
corona patients increased in kolhapur 165 new corona patients cases registered today 
छत्रपती संभाजीनगर

पैठणमध्ये रोज ९० कोरोनाबाधितांची भर, स्थिती दिवसेंदिवस गंभीर

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पैठण (Paithan) तालुका हादरला असून गेल्या दहा दिवसांत तालुक्यात तब्बल ९१० पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट (Corona Hotspot) झाला आहे. सर्वाधिक कोरोना (Corona) बळींची १८१ संख्या पाचोड या गावात आहे. तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने सर्वसामान्य नागरिक प्रचंड धास्तावला आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून तालुक्याच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुकावासी धास्तावले आहेत. तालुक्यात सर्वाधिक रूग्ण पाचोड १८१, यानंतर बिडकीन ११५, चितेगाव ९५, पिंपळवाडी ८७, व विहामांडवा ८५ आहे. केकत जळगाव १, हर्षी १, पाचोड खुर्द २, पाचोड बु. ३ व गेवराई मर्दा ३ असे पाचोड व परिसरात १० रूग्ण दगावल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. (Aurangabad Latest News Every Day 90 Corona Cases Reports In Paithan)

तालुक्यात कोरोना झपाट्याने पाय पसरत असल्याने आणि खासगी दवाखान्यातील कोरोनावरील उपचाराचा खर्च पाहता सर्वसामान्य नागरिकांचे डोळे पांढरे होत आहेत. तालुक्यातील सरकारी ग्रामीण रुग्णालय या शासकीय कोविड सेंटरमधील ऑक्सिजन बेडची संख्या पुरेशी नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालये गाठावी लागत आहेत. गेल्या दहा दिवसात ८२४ कोरोना बाधितांची संख्या आहे. पैठण तालुक्यात एकूण १९१ गावे असून यापैकी ३० गावांत शिरकाव नसल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.

आतापर्यंत चार हजार ८८८ कोरोना बाधित रुग्ण असून त्यापैकी ४ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहे. तर एकूण ५९ रुग्णांचा बळी गेला आहे. सद्या एकूण ७०६ रुग्ण उपचार घेत आहे. यात पैठण तालुक्यात ४५० तर औरंगाबाद येथे २५६ रुग्ण उपचार घेत आहे. तालुक्यातील सहा कोविड असून त्यात शासकीय मुलींचे वस्तीगृहात ५७, ग्रामीण रुग्णालय पाचोड २६, चित्तेगाव ३४, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रबोधिनी जायकवाडी उत्तर ४३, ग्रामीण रुग्णालय बिडकीन २२ उपचार घेत असून २६८ जणांचे गृह विलगीकरण करण्यात आले आहे.

खबरदारी हाच एकमेव उपाय!

पैठण शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. गतवर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत शहरासह तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होता. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत होता. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख उंचावला असून पैठण शहरासह तालुक्यातही कोरोना बाधितांची वाढत असलेली रुग्णांची संख्या चिंता वाढविणारी आहे. त्यासाठी खबरदारी हाच एकमेव उपाय असल्याचे सद्या दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT