leopard dead 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यावरील हल्ल्यानंतर काही वेळातच बिबट्याचाही मृत्यू

सकाळ ऑनलाईन टीम

बनशेंद्रा (औरंगाबाद): शिवारातील गट नंबर १६० शेतात आज शुक्रवार (ता.दोन) दुपारी एक वाजेदरम्यान बिबट्या आढळून आला होता. या शेतात महेश मोतींगे हे पाणी भरण्यासाठी गेले असता अचानक मागून बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे या प्रसंगानंतर काही वेळात बिबट्याचाही मृत्यू झाला. याचे कारण दोन बिबट्यामधील भांडण सांगितले आहे. मृत बिबट्याच्या अंगावर बऱ्याच जखमाही होत्या.

घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. तत्पुर्वी बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी आरडाओरड केल्यावर आजूबाजूचे शेतकरी आणि गावकरी जमा होऊन संबंधित वनविभागतील वनपाल प्रवीण कोळी यांना घटनेबाबात माहिती देण्यात आली होती.

त्यानंतर प्रवीण कोळीसह वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्य सुरू होती. जखमी महेश मोतींगे यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. पण दुर्दैवाने या हल्ल्यानंतर बिबट्याचा मृत्यू झाला आहे. सध्या बिबट्याचा मृत्यू जिथं झाला तिथं पंचनामा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : "...तर सेवेचा राजीनामा द्या अन् संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा"; राज ठाकरेंची IPS विश्वास नांगरे पाटलांवर टीका

Malvan Swimming Pool VIDEO : काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून मारली उडी, डोकं तळाशी जोरात आपटलं, 25 वर्षीय युवकाचा दुर्दैवी अंत

Latest Marathi News Live Update : पोर्टलवर खताचा साठा भरपूर, पण तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी संकटात

Samsung Discount Offer : चक्क 24 हजारपेक्षा जास्त डिस्काउंट; सॅमसंगच्या 'या' प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर सूट

Ind-US ट्रे़ड डील फायनल होणार? डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर, परराष्ट्र मंत्र्यालयाने नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT