petrol diesel in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

आता १५ एप्रिलपर्यंत रात्री फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच मिळणार पेट्रोल

प्रकाश बनकर

औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी रात्री आठपासून मेडिकल व दवाखाने वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात येत आहे. त्यात आजपासून १५ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत पेट्रोल-डिझेल देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पेट्रोल पंपचालकांना शुक्रवारी (ता.दोन) दिल्या. 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, की प्रत्येक शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवांमध्ये येणाऱ्या वैद्यकीय सेवा, ऑक्सिजन गॅस सिलिंडरची वाहतूक करणारी वाहने, वृत्तपत्र मीडिया संदर्भातील सेवा, दूध विक्री व पुरवठा, भाजीपाला विक्री व पुरवठा, फळे विक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा खासगी व शासकीय रिक्षासह, बांधकामे उद्योग व कारखाने, किराणा दुकाने, चिकन-मटण-अंडी, मांस विक्रीची दुकाने, वाहन दुरुस्ती दुकाने वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने, बँक व पोस्ट यांना रात्री आठपासून सकाळी सातपर्यंत पेट्रोल-डिझेल व इंधन देण्याची सुविधा करण्यात यावी.

पेट्रोल पंपावर पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव राहील, पंपांवरील कर्मचारी यांना नियमितपणे मास्क वापर सक्तीचा करावा, पेट्रोल भरण्यात येणाऱ्या मास्क नसेल तर पेट्रोल-डिझेल देऊ नयेत. फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे. पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही या अनुषंगाने पेट्रोल पंपचालकांनी नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिल्या आहेत. याविषयी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपचालकांसाठीची नियमावली ही काढली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT