Aurangabad Mrinal Jadhav degree exam paper on her wedding day sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : मुंडावळ्या, चुड्यासह नवरी पदवी परीक्षेत

मृणाल जाधवचे शिक्षणाला प्राधान्य; परीक्षा पुढे ढकलल्याने लग्नाच्या दिवशीच आला पेपर

सचिन माने

औरंगाबाद : आधी पदवीची परीक्षा देऊ, नंतर लग्न करू. याच हिशोबाने मुलीच्या घरच्यांनी लग्न ठरवले होते. मात्र, परीक्षेतील एक पेपर नेमका पुढे ढकलला आणि तो लग्नाच्या दिवशीच आला. मग काय पेपरच्या आधी मुंडावळ्या, चुडा आणि शालू नेसून हळदीसह परीक्षा केंद्र गाठून तिने परिक्षा दिली. पेपर संपताच तिने थेट लग्नमंडप गाठून लग्न विधी पार पाडला. ऐन लग्नाच्या दिवशीच पेपर असल्याने तिने हार न मानता पेपर दिल्याने नवरीचे कौतुक होत आहे.

मृणाल सुभाष जाधव (रा. मयुरनगर हडको, औरंगाबाद) असे या नवऱ्या मुलीचे नाव असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी परीक्षेला एक जूनपासून सुरवात झाली. मात्र, ऐनवेळी पाच जूनला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे वेळापत्रक आले. त्यांना परीक्षेसाठी चार जूनलाच परीक्षा केंद्र ताब्यात घ्यायची असल्याने विद्यापीठाचा चार तारखेचा पदवीचा पेपर रद्द करण्यात आला होता. तो पेपर कधी होणार हे उशिरा जाहीर करण्यात आले.

नेमके तो पेपर १९ जूनला होणार असल्याची तारीख जाहीर करण्यात आली. मात्र, मृणाल जाधव हिच्या लग्नाची तारीख तीच असल्याने तिच्यासह कुटुंबीयांपुढे प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मृणालने हार न मानता आधी परिक्षा देऊन नंतर लग्नविधी पार पाडण्याचा निर्णय कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे कुटुंबीयांनीही तिला आधी परिक्षेला जाण्याची परवानगी दिली. यानंतर तिने थेट हर्सूल सावंगी येथील एका खासगी महाविद्यालयात जाऊन बीसीएस’चा मराठी विषयाचा पेपर दिला. येथून थेट ती विवाहासाठी हडको एन ११ येथील मंगल कार्यालयात लग्न मंडपात हजर झाली. विवाह सोहळा पार पडल्यानंतर नवरीच्या सासरच्या तसेच माहेरच्या नातेवाइकांनी तिचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT