छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : पूर्वीच्या अर्ध्या भागात बदल 

शेखलाल शेख

वॉर्ड क्रमांक 45 : नेहरूनगर 

मागील निवडणुकीत नेहरूनगर वॉर्ड क्रमांक 26 असा होता. नवीन रचनेत या वॉर्डाला 45 क्रमांक मिळाला. पूर्वी या वॉर्डात शताब्दीनगर वॉर्ड क्रमांक 27 चासुद्धा भाग होता. या वॉर्डात एमआयएमचे प्राबल्य राहिले; मात्र आता या वॉर्डात शताब्दीनगरच्या गल्ल्या वगळण्यात आल्या असून, यामध्ये नेहरूनगर, शरीफ कॉलनीचा काही भाग किराडपुरा, यशोधरा कॉलनी, कटकट गेट परिसर जोडण्यात आला आहे. हा वॉर्ड सर्वसाधारणसाठी असल्याने येथे इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत.

क्लिक करा : मंदी संपताच बजाज ऑटोचा होणार विस्तार

असा झाला बदल 

उत्तर भाग : कटकट गेटमार्गे सहारा नान सेंटर ते रॉयल दूध डेअरी ते पोलिस मेस रोड ते गॅलेक्‍सी फार्मापासून विद्युत डीपीमार्गे पूर्वेस डिकाशन हॉटेल ते गल्ली क्रमांक चार, रिजवान किराणा ते सुनील मेंढे यांच्या घरापर्यंत.

पूर्व भाग : तृप्ती सदन ते चाऊस यांच्या घरापासून ते अफसर किराणा जनरल स्टोअर्सपर्यंत.

दक्षिण भाग : अफसर किराणापासून ते जावेद किराणा जनरल स्टोअर्समार्गे पूर्वेस अलिम किराणापर्यंत ते सलीमभाई यांच्या घरापासून एम.एस. टेलर ते गल्ली नंबर पाच शरीफ कॉलनीमार्गे अरफात कब्रस्तानमार्गे मकतब उमरबिन खताब मदरसापर्यंत.

पश्‍चिम भाग : मकतब उमरबिन मदरसापासून कटकट गेट, सहारा नान सेंटरपर्यंत.

लोकसंख्या  : 11,640 
अनुसूचित जाती : 07 
अनुसूचित जमाती  :11 


येथील मुख्य रस्त्याची मोठी समस्या आहे. मुख्य रस्त्याची चाळणी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. स्ट्रीट लाइटसुद्धा बंद असतो; पण याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. 
- इरफान खान 

येथे अंतर्गत रस्ते झालेले असले तरी मुख्य रस्त्याचे काम झाले नाही. दूषित पाण्याची समस्या कायम आहे; तसेच ड्रेनेज लाइन चोकअप होत असल्याने त्रास होतो. याकडे लक्ष द्यावे. 
- साबेर खान 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT