औरंगाबाद महापालिका
औरंगाबाद महापालिका 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेतील ३१ वॉर्ड होणार खुले! दिग्गजांना बसणार फटका

माधव इतबारे

राज्यातील औरंगाबादसह नवी मुंबई, वसई विरार व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड रचना, वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यासासह निवडणुकीची संपूर्ण तयारी केली होती.

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Of India) स्थानिक स्‍वराज्य संस्थांमधील ओबीसी (OBC) प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द (Political Reservation) करण्याचा निर्णय दिल्याने महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) आगामी निवडणुकीतील वॉर्ड आरक्षणावर परिणाम होणार आहे. ओबीसी प्रवर्गासाठी असलेले ३१ वॉर्ड आता खुल्या प्रवर्गासाठी गृहीत धरले जातील. इतर रचनेत मात्र बदल होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका न्यायप्रविष्ट आहे. राज्यातील औरंगाबादसह नवी मुंबई, वसई विरार व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने वॉर्ड रचना, वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यासासह निवडणुकीची संपूर्ण तयारी केली होती. पण कोरोना संसर्गामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या. (Aurangabad Municipal Corporation's Thirty-One Wards To Be Open For Open Category)

दरम्यान औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूकीसाठी करण्यात आलेली वॉर्ड रचना आणि वॉर्ड आरक्षणाबाबत आक्षेप घेत माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी जैसे थेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. असे असतानाच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करण्यात येत असल्याचा निकाल दिला. या आदेशाचे शहरातील वॉर्ड आरक्षणावर काय परिणाम होणार? याविषयी राजकीय खल सुरू आहे. यासंदर्भात काही जाणकारांनी सांगितले की, ज्या वॉर्डांचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे ते वॉर्ड आता खुले गृहीत धरले जातील.

एससी, एसटीचे वॉर्ड जशास तसे

एससी व एसटी प्रवर्गासाठीचे आरक्षण हे घटनादत्त असल्याने या आरक्षणात कुठलाही बदल होणार नाही. तसेच खुल्या प्रवर्गासाठीच्या वॉर्डांना देखील हात लावला जाणार नाही. ओबीसी प्रवर्गासाठीचे आरक्षण रद्द झाल्याने महिलांसाठीचे १६ व पुरुषणांचे १५ असे ३१ वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी होतील, असे सूत्रांनी सांगितले.

आजी-माजी पदाधिकाऱ्यांना फटका

महापालिकेत वर्षानुवर्षे ठाण मांडून असलेल्या अनेक आजी-माजी नगरसेवकांना ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी आरक्षण सोडत निघाल्यापासून वॉर्डात तयारी करून ठेवली आहे. पण हे वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी गृहीत धरल्यास वॉर्डातील चुरस वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT