Aurangabad amc news
Aurangabad amc news 
छत्रपती संभाजीनगर

रस्त्यावर वाहने उभी करताय, आता मोजा एवढे पैसे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद-शहरातील सर्वच रस्त्यांवर दररोज हजारो वाहने उभी असतात; मात्र यापुढे रस्त्यावर दुचाकी, तीन, चारचाकी वाहने उभी केल्यास तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिकेने पार्किंग धोरण निश्‍चित करत वाहनधारकांकडून पैसे वसुल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १८) सायंकाळी सर्वसाधारण यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 

शहर व जिल्ह्यात वाहनांची संख्या भरमसाठ वाढली आहे. आजघडीला ही वाहनसंख्या १३ लाखांवर पोचली असून, त्यातील ६० टक्के वाहने शहरात आहेत. तसेच दरवर्षी वाहनांच्या संख्येत सरासरी आठ टक्के एवढी भर पडत आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात शहरात ७१ हजार ७६१ दुचाकी, ६१२ तीन चाकी, ८ हजार ७२५ चारचाकी वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यातील हजारो वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. यासंदर्भात तज्ञांमार्फत अभ्यास करून महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी पार्किंगचे धोरण निश्चित केले आहे. अ -वर्ग- ६० ते २४ मिटर, ब-वर्ग २४ ते १८ मिटर तर क-वर्ग १८ ते ९ मिटर अशी रस्त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांना पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे.

तसेच निराला बाजार, औैरंगपुरा, रेल्वेस्टेशन, गोपाल टी, क्रांती चौक, पुंडलिकनगर, सिडको कॅनॉट प्लेस, टाऊन हॉल, टी. व्ही. सेंटर, जळगाव रोड, सिडको एन-१, महावीर चौक, एस. बी. महाविद्यालय, एसएससी बोर्ड, कोकणवाडी चौक, अदालत रोड आदी ठिकाणी रात्रीचे मासिक शुल्कही आकारण्यात येईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या प्रस्‍तावाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. 

कंत्राटदाराची करणार नियुक्ती 
पार्किंग शुल्क वसुल करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती केली जाणार आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्वरित पार्किंग लॉटची आखणी केली जाईल. ठिकठिकाणी साईन बोर्ड, स्थापत्य कामे, माहिती फलक, दर आदी बोर्ड लावण्यात येतील. त्यासाठी खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर... 
 
दुचाकीसाठी पार्किंग शुल्क 

वर्गवारी दोन तास चार तास चार तासापेक्षा अधिक 
अ-रस्ता १५ रुपये ०५ रुपये अतिरिक्त १० रुपये अतिरिक्त 
ब-रस्ता १० रुपये ०५ रुपये अतिरिक्त १० रुपये अतिरिक्त 
क-रस्ता ०५ रुपये ०५ रुपये अतिरिक्त १० रुपये अतिरिक्त 

चारचाकी वाहनांसाठी 
अ-रस्ता ३० रुपये ०५ रुपये अतिरिक्त १० रुपये अतिरिक्त 
ब-रस्ता २०रुपये ०५ रुपये अतिरिक्त १० रुपये अतिरिक्त 
क-रस्ता १० रुपये ०५ रुपये अतिरिक्त १० रुपये अतिरिक्त 
 
व्यावसायिक जड वाहनांसाठी 
अ-रस्ता १०० रुपये -रात्री नऊ ते सकाळी सहापर्यंत 
 
अहोरात्र पार्किंग शुल्क 
मासिक शुल्क - ५०० रू (तीनचाकी), ५०० रू (चारचाकी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT