file photo
file photo sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : सळई डोक्यात घालून पत्नीचा निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा

वाळूजमहानगर : चारित्र्यावर संशय घेतल्याचे भूत मानगुटीवर बसले आणि त्याने तिच्या डोक्यात हत्याराने वार करत खून केला. घाणेगाव येथील संघर्षनगरमध्ये घडलेली ही अत्यंत खळबळजनक घटना गुरुवारी (ता.८) सकाळी उघडकीस आली. वाळूज परिसरातील खुनाच्या घटनेत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

वाळूज परिसरातील संघर्षनगर, घाणेगाव येथील संतोष प्रभाकर जाधव (वय ३८) हा वाहनचालक आहे. तो पत्नी लक्ष्मीबाई जाधव (३६) सह राहतो. त्यांना १३ वर्षांचा एक मुलगा आहे. सुखाचा संसार सुरू असताना संतोष जाधव याच्या मानगुटीवर संशयाचे भूत बसले. या कारणावरून त्यांच्यात नेहमी खटके उडत होते. बुधवारी (ता.७) याच कारणावरून पती-पत्नी यांच्यात रात्री वाद झाला. वाद वाढल्याने संतोष जाधव याने हत्याराने पत्नीच्या डोक्यात मारले. त्यामुळे जबर मार लागल्याने पत्नीचा मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे, पोलिस उपनिरीक्षक स्वाती उचित, शेकनाथ आधाने, राहुल निर्वळ, अशोक इंगोले, धनराज राठोड, पोलिस कर्मचारी किशोर घुसले, राजाभाऊ कोल्हे, यशवंत बोबडे, फिरोज तडवी, रोहित चिंधडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आरोपी संतोष जाधव याला ताब्यात घेतले. घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT