Ajanta Caves News esakal
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा लेणीत पर्यटकांचा बैलगाडीतून प्रवास, शंभरहून अधिक जण परतले

पर्यटकांना बैलगाडीने प्रवास करावा लागला.

प्रकाश बनकर

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतर्फे वेतन वाढीसह इतर विविध मागण्यासंदर्भात गुरुवारपासून (ता.२८) बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची बससेवा ठप्प झाली आहे. अजिंठा लेणीत (Ajanta Caves) असलेल्या पर्यावरणपूरक बससेवा बंद असल्यामुळे पर्यटकांना बैलगाडीने प्रवास करावा लागला. दुसरीकडे शंभरहून अधिक प्रवाशी माघारी परतले. अजिंठा लेणीत एसटी महामंडळातर्फे पर्यावरणपूरक बसेस चालविण्यात येते. एसटीच्या (Aurangabad) कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे गुरुवारी सर्व बससेवा बंद ठेवण्यात आली. यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी मोठ्या उत्साहाने आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. अजिंठा लेणी पाहण्यासाठी गुरुवारी जिल्ह्यासह राज्यभरातून १४० पर्यटक आले होते. त्यापैकी केवळ ३० ते ३५ पर्यटकांनी बैलगाडीच्या माध्यमातून लेणीपर्यंत गेले. मात्र लेणीपर्यंत जाण्यासाठी (ST Bus Workers Strike) बैलगाडी चालकांनी जास्तीचे पैसे आकारले. आतापर्यंत व्ह्यु पॉँईट ते लेणीपर्यत जाण्यासाठी केवळ पर्यावरणपूरक बस धावतात, पहिल्यांदाच बैलगाडीचा वापर करण्यात येत आहे.

अजिंठा लेणी पाहण्यासाठी १४० पर्यटक आले होते. त्यापैकी तीस ते चाळीस प्रवाशांनी बैलगाडीच्या माध्यमातून लेणीपर्यंत प्रवास केला. उर्वरित शंभरहून अधिक प्रवाशी माघारी परतले. तर अनेकजण व्ह्यू पॉँईटवरूनच माघारी परतले आहे. बुधवारी बससेवा सुरळीत होती. आज बससेवा परिणाम झाल्यामुळे अनेक पर्यंटकांनी नाराजी व्यक्त केली. तर काहींनी बैलगाडीचा आधार घेतला.

- डी.एस.दानवे, वरिष्ठ संर्वधन सहायक, भारतीय पुरातत्त्व विभाग, अजिंठा लेणी

बससेवा ठप्प असल्यामुळे पर्यवाशांची गैरसोय झाली. यात काही शेतकऱ्यांनी पूढे येत बैलगाडीच्या माध्यमातून प्रवाशांना लेणीपर्यंत घेऊ गेले. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीची दोन बसेस शुक्रवारी (ता.२९) चालविण्यात येणार असल्याची माहिती, एमटीडीसीचे व्यवस्थापक श्री.रामदास यांनी सांगितले. यामुळे पर्यटकांच्या अडचणी दूर होतील.

- मौश्मी कोसे, प्रादेशिक व्यवस्थापक. एमटीडीसी, औरंगाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT