Aurangabad Order to shoot drones found flying at airport
Aurangabad Order to shoot drones found flying at airport sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : विमानतळावर ड्रोन उडताना आढळल्यास शूट करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : विमानतळ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ड्रोन उडताना दिसल्यास त्याला थेट शूट करण्याचे आदेश केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) देण्यात आले आहेत. विमानतळ प्रतिबंधित क्षेत्राच्या तीन किलोमीटर क्षेत्रात विनापरवानगी ड्रोन उडविल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोघांवर नुकताच कारवाईचा बडगाही उगारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ड्रोन किंवा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या विमानांच्या साहाय्याने शहरावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी जून २०२१ मध्ये जम्मू येथील विमानतळावर स्फोटके असलेली दोन ड्रोन आढळली होती. दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर अधिक वाढल्याने भविष्यात शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी देखील ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉटएअर बलून्स, मायक्रोलाइट, एअरक्राफ्ट आदींच्या माध्यमातून हल्ले होण्याची शक्यता आहे. यामुळे विमानतळ ठिकाणची सुरक्षितता व शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ड्रोन बंदी घालण्यात आली आहे. एखाद्याला ड्रोन उडवायचा असेल तर त्यासाठी विमानतळ प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे.

विमानतळ प्रशासनाची परवानगी घेऊन एका संस्थेने ड्रोन उडविले होते. त्यांना ठराविक वेळेपुरती परवानगी देण्यात आली होती. मात्र, वेळेची मर्यादा ओलांडून संबंधित व्यक्तीने ड्रोन उडवून चित्रीकरण सुरूच ठेवले होते. शिवाय विमानतळाशेजारी असलेल्या मंगल कार्यालयात आयोजित लग्नसमारंभात विनापरवाना ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येत होते. हे दोन्ही प्रकार सीआयएसएफ जवानाच्या निदर्शनास येताच कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन किलोमीटर परिसरात बंदी

नियमानुसार विमानतळाच्या तीन किलोमीटर परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी आहे. असे असतानाही एखादे ड्रोन या परिसरात आल्यास त्याला प्रथम सुरक्षितपणे खाली उतरण्याचा इशारा दिला जातो. त्यानंतर ड्रोन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत. तसेच ड्रोन विमानतळ परिसरात घिरट्या घालत असेल किंवा विमानतळावर विमान थांबलेली असताना ड्रोन त्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याक्षणी शूट करण्याचे आदेश देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT