Aurangabad Parking policy approved sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पार्किंग पॉलिसीचा ठराव अखेर मंजूर

शहरात सात ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहराचे पार्किंग धोरण ठरविण्यासाठी महापालिकेचा अनेक वर्षांपासून खल सुरू होता. त्यानुसार अखेर पार्किंगचे धोरण ठरविणार ठराव प्रशासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार शहरातील सात ठिकाणी प्रायोगिक तत्वावर धोरण राबवले जाणार आहे.

शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनेक मुख्य रस्त्यावरच वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यानुसार शहरासाठी पार्किंग पॉलिसी तयार करण्याचे काम सुरु होते. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त अपर्णा थेटे, स्मार्ट सिटी अभियानाची टीम व मुंबई येथील वाहतूक तज्ज्ञ तृप्ती अमृतवार वैतला, अशोक दातार यांनी वारंवार बैठका घेतल्या.

अर्बन रिसर्च फाउंडेशन या संस्थेनेही या कामात मदत केली. पार्किंग पॉलिसी राबवण्यासाठी स्थानिक स्टार्टअप कर्बलेटसोबत महापालिकेने करार केला आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो मंजूर करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर शहरात सात ठिकाणी पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी केली जाणार आहे. कॅनॉट प्लेस, जिल्हा न्यायालयाची विरुध्द बाजू, पुंडलिक नगर, टीव्ही सेंटर, निराला बाजार व सूतगिरणी चौक या ठिकाणी पार्किंग धोरणानुसार बदल केले जातील. या ठिकाणी पार्किंग झोन, नो पार्किंग झोन आणि फ्री पार्किंग झोन अशी मार्किंग केली जाणार आहे.

मोबाईल ॲपचा होणार वापर

कर्बलेट या संस्थेने मोबाईल अॅप तयार केले आहे. या अॅपचा उपयोग करून नागरिक त्यांची गाडी पार्क करण्यासाठी स्वत:च जागा निवडू शकणार आहेत. पार्किंग पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे वाहतुककोंडी टाळता येईल, प्रदूषणावर नियंत्रणात येईल, असे स्मार्ट सिटीतर्फे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT