parking sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : पार्किंग धोरण कागदावरच

शहरातील पार्किंगचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

राजेश नागरे

औरंगाबाद : शहरातील रस्त्यावर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी महापालिकेने स्‍मार्ट सिटीच्या माध्यमातून पार्किंग धोरण तयार केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सात रस्त्यांवर पार्किंगचे धोरण राबविले जाणार आहे. या धोरणाची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली पण कॅनॉट प्लेस वगळता इतर भागात पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. दरम्यान प्रशासक डॉ. अभिजित चौधरी मंगळवारी (ता. १८) आढावा घेणार आहेत.

शहरातील पार्किंगचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत तीन चार वर्षांपासून बैठका घेत पार्किंग धोरण तयार केले आहे. त्यानुसार ‘पे ॲण्ड पार्कसाठी ‘करब्लेट ॲप’ तयार करण्यात आले आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर शहरातील सात रस्त्यावर पार्किंगच्या जागा शिल्लक आहेत का? याची माहिती मिळणार आहे. जागा असल्याचे दिसल्यानंतर ॲपच्या माध्यमातून पार्किंग बुक करण्याची व्यवस्था या ॲपमध्ये आहे. तसेच पार्किंगच्या जागीदेखील पैसे देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

क्यूआर कोड स्कॅन करून नागरिकांना पार्किंगचे शुल्क भरता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. सिडको कॅनॉटप्लेस, निराला बाजार, उस्मानपुरा, अदालत रोड, सूत गिरणी चौक, पुंडलिकनगर, टीव्ही सेंटर या सात ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर पार्किंग धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरवातीला दोन महिने ही सुविधा मोफत असेल, असेही जाहीर करण्यात आले होते. पण सिडको कॅनॉट येथेच कंत्राटदाराने काम सुरू केले. पण दरम्यानच्या काळात प्रशासक बदलले व महापालिकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने कंत्राटदाराने पुढील काम थांबविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री! रात्री उशिरा मुंबईकडे रवाना; प्रथमच महिलेकडे पद

काटेवाडी ते मंत्रालय... नेतृत्वासाठी तयार झालेलं व्यक्तिमत्त्व; सामाजिक कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक प्रवास

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune Traffic : नवले पुलावर तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान लेन बंद; कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT