Aurangabad Police harassment his wife for demanding money sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पोलिसाकडून पत्नीचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा

माहेराहून पाच लाख आणण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पत्नीला माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करत तिचा शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस पती, सहायक फौजदार सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ जुलै ते २६ नोव्हेंबर २०२१ या काळात घडल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिस उपअधीक्षकांच्या वाहनाचा चालक अशोक रामचंद्र महाले यांचा मुलगा शुभम अशोक महाले (रा. सुधाकरनगर, पोलिस वसाहत हाउसिंग सोसायटी) याने पत्नीला माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणत तिला मारहाण व शिवीगाळ करून घराबाहेर हाकलून दिले. तसेच पैसे आणल्याशिवाय घरात येऊ नको असे म्हटल्यामुळे विवाहिता माहेरी निघून गेली.

त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये महिला तक्रार निवारण कक्षात विवाहितेने पती शुभम महाले, सहायक फौजदार सासरे अशोक रामचंद्र महाले, दिर सागर अशोक महाले आणि सासुविरुध्द तक्रारी अर्ज दिला होता. मात्र, महिला तक्रार निवारण कक्षात तडजोड न झाल्यामुळे विवाहितेने सातारा पोलिस ठाणे गाठत महाले कुटुंबीयांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक शंकर शिरसाट करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik: अमृतकुंडातील शिवलिंग 'नव्याने प्रकट' नाही, त्र्यंबकेश्वर देवस्थानने केला खुलासा

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: सायन पनवेल महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा

Sangli DCC Bank Recruitment : 444 लिपिक पदांच्या भरतीचा वाद चिघळला! राज्य सरकारच्या 'त्या' निर्णयाविरोधात सांगली जिल्हा बँक न्यायालयात, 'सर्किट बेंच'च्या भूमिकेकडे लक्ष

Crime: विवस्त्र अवस्थेत ब्युटी पार्लरमध्ये घुसण्याचा प्रयत्न, महिलेसोबत धक्कादायक कृत्य; बदलापूरमधील घटना

SCROLL FOR NEXT