IIT लॅब
IIT लॅब sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : स्मार्ट सिटीच्या रस्त्यांची होणार IIT लॅबमध्ये तपासणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या रस्त्यांची तपासणी आयआयटीच्या लॅबमध्ये होणार आहे. दरम्यान दुसऱ्या दिवशीही मंगळवारी (ता. १५) आयआयटी मुंबईच्या पथकाने शहरात विविध ठिकाणी भेट देत पाहणी केली.

स्मार्ट सिटी अभियानामार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता तपासणी करण्यासाठी प्रा.डॉ. धर्मवीर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथक सोमवारी (ता.१४) शहरात दाखल झाले आहे. सोमवारी या पथकाने शहराच्या विविध भागांत जाऊन पाहणी केली होती. मंगळवारी देखील पथकाने पाहणी केली. यावेळी स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान, किरण आढे, कनिष्ठ अभियंता नेत्राप्रभा जाधव, प्रकल्प सल्लागार यश इंनोवेशन्सचे फारुकी झफीर उपस्थित होते. मंगळवारी सकाळी तज्ज्ञांचा पथकाने कांचनवाडी येथील रेडी मिक्स प्लांटला भेट दिली.

रस्ते कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची प्रक्रिया तपासली. रेडीमिक्स तयार झाल्यानंतर ते एका तासाच्या आत वापरले गेले पाहिजे. उशिराने आलेला साहित्य नाकारले पाहिजे. पथकाने सोमवारी सॅंपल क्यूब घेतले होते. ते तोडून त्याची मजबुती तपासण्यात आली. पथकाने चाचणी संदर्भातील कागदपत्रे तपासले. पथकाने पाडेगाव, माऊली मेडिकल ते भावसिंगपुरा कमान, एसबीओए, पिसादेवी, शिवछत्रपती महाविद्यालय ते हायकोर्ट व पारिजातनगर येथेल रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. पथकाने रस्त्यांचे नमुने घेतले आहेत. त्याची तपासणी आयआयटीच्या प्रयोगशाळेत होणार आहे, असे डॉ. धर्मवीर सिंग सांगितले.

फूटपाथचे काम रस्त्यासोबत होणे गरजेचे

रस्त्यासोबत फुटपाथ तयार करणे गरजेचे आहे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. कन्स्ट्रक्शन जॉइंटसाठी एपॉक्सी ट्रीटमेंट करून करण्यात यावे अशी ही सूचनाही पथकाने केली. रस्त्यांच्या कामाचा अभ्यास करून तज्ज्ञ औरंगाबाद स्मार्ट सिटीला अहवाल देणार आहेत. त्यानुसार कंत्राटदारांकडून काम करून घेण्यात येईल, असे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT