मुक्तिसंग्राम  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : मुक्तिसंग्राम दिनानिमित्त रविवारी ‘रन फॉर युनिटी’

स्वातंत्र्य सैनिकांचे ‘ सिद्धार्थ''मध्ये चित्रप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त येत्या रविवारी (ता. १८) ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येणार आहे. विभागीय क्रिडा संकुलापासून सकाळी ७.३० वाजता याची सुरूवात होणार आहे. मराठवाड्याला निजामाच्या गुलामीतून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतुने या रनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत नागरिकांचा व संस्थांचा सहभाग राहणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.१२) झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांची उपस्थिती होती. केंद्रीय मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सीएमआय, व्यापारी महासंघ, मसिआ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महापालिका, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, छावणी परिषद, पोलिस विभाग, आरटीओ, स्काऊट गाइड, एनसीसी, वन विभाग, औरंगाबाद फर्स्ट, क्रेडाई, डॉक्टर असोसिएशन, सीए असोसिएशन, रोटरी, जायंट्स, लायन्स क्लब, माजी सैनिक विभाग, एनजीओ अशा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांच्या क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

ही दौड ३ किलोमीटर अंतराची असणार आहे. दौडमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दौडच्या मार्गाचे नियोजन पोलिस विभागातर्फे करण्यात येणार आहे. या दौडमध्ये सहभागींना ग्रीन ग्लोब फाउंडेशन आणि टीएफआयतर्फे सिडबॉल देण्यात येणार आहे. दौडचे नियोजन यशस्वी करण्याकरिता विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे. दौडसाठी औरंगाबाद ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ. उदय डोंगरे, सीएमआयचे अध्यक्ष नितीन गुप्ता, सचिव अर्पित सावे, दुष्यंत पाटील, मसिआचे अध्यक्ष भगवान राऊत, डॉक्टर असोसिएशनचे ड. प्रफुल्ल जटाळे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, माजी क्रीडा अधिकारी गोकूळ तांदळे, अॅथलेटिक्स कोच सुरेंद्र मोदी, टीएफआयचे दीपक कोलते, आनंद दरक, राहुल डुकरे, अनंत वजंरीनकर, मंगेश तोडेकर आदींनी पुढाकार घेतला आहे.

सिद्धार्थ उद्यानात चित्रप्रदर्शन

जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आणि सारंग टाकळकर, प्रा. फुले यांच्या सहकार्याने मराठवाडा मुक्ती संग्रामातील सहभागी स्वातंत्र्यसैनिकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. शनिवारपासून (ता.१७) तीन दिवस सिद्धार्थ उद्यानात हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. यात या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, शहिदांची छायाचित्रे व त्यांच्याविषयीची उदबोधक माहिती राहणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT