समृद्धी महामार्ग
समृद्धी महामार्ग  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : ‘समृद्धी’वर दामटतात दुचाकी!

सचिन माने

औरंगाबाद : समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डीपर्यंत अधिकृतपणे खुला झाला आहे. रस्त्यावरून जड वाहनांसह, कार सुसाट वेगाने जात आहेत. मात्र, यात नियम तोडून काहीजण दुचाकी घेऊन जात आहेत. रविवार (ता.११) पासून हा प्रकार घडत आहे. कित्येकजण पळशी शहराजवळील बोगदा तसेच रस्त्यावर ‘फोटो सेशन’ करीत आहेत. मात्र, याकडे फारसे लक्ष देणारे कुणीही नाही.

समृद्धी महामार्ग सुरू झाल्याने त्याचे सर्वांनाच आकर्षण आहे. वेगाने गाड्या जात असल्याने या रस्त्यावर गाडी चालविण्याचा अनुभव कसा आहे हे बघण्यासाठी कित्येक जण या रस्त्यावर प्रवास करत आहेत. मात्र, कित्येक ठिकाणी वाहने थांबवून फोटो सेशन केले जात आहे. विशेषतः पळशी शहर येथील बोगद्याचे सर्वांना आकर्षण आहे. येथे सर्वाधिक फोटोसेशन होते. तसेच रस्त्याच्या कडेला काही जण फोटो काढत आहेत तर काही जण ‘रील’ तयार करत आहेत.

रस्त्याच्या कडेला असलेली गावे, वस्तीवरील काही जण या रस्त्यावर मनसोक्त फिरत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्याच्या खाली सुरक्षा जाळी, कडे लावण्यात आलेले असूनही ते पार करीत अनेकजण रस्त्यावर जात आहेत.

दुचाकींना नाही परवानगी

समृद्धी महामार्गावर दुचाकींना परवानगी नाही. कार आणि जड वाहनांचा वेग येथे वाऱ्यासारखा आहे. तरीही काही जण नियम तोडून समृद्धीवर दुचाकी दामटत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यावर प्रवेश करण्यासाठी जवळपास सर्वच जागा बंद करण्यात आल्या आहे तरी ही काही जण नियम तोडून दुचाकी घेऊन फिरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT