Covid Vaccination sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : दुसरा डोस आता घरी जाऊन देणार

तीन आरोग्य केंद्र व दोन दुकानांमध्ये सायंकाळी चार ते रात्री १० दहा या काळात लसीकरण सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मंदावलेली गती वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे विविध प्रयोग केले जात आहेत. आता दुसरा डोस न घेणाऱ्यांना घरी जाऊन लस दिली जाणार आहे. तसेच पवित्र रमजानमुळे तीन आरोग्य केंद्र व दोन दुकानांमध्ये सायंकाळी चार ते रात्री १० दहा या काळात लसीकरण सुरु ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती सध्या मंदावली आहे. शहरात ८० टक्के लसीकरण झाले आहे. मात्र पहिला डोस ९० टक्के तर दुसरा डोस ७० टक्के नागरिकांना द्यावा लागणार आहे. याअनुषंगाने प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी ४० आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांची बैठक घेतली. पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे सायंकाळनंतर लस उपलब्ध व्‍हावी यासाठी सिडको एन-८ रुग्णालय, सिल्क मिल कॉलनी रुग्णालय, कैसर कॉलनी रुग्णालयात सायंकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण सुरु ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासोबतच पैठणगेट येथील फॅशन बाजार व सिटीचौकातील सामी कटपीस सेंटर या दोन ठिकाणी सायंकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे.

नावांची यादी तयार

दुसरा डोस न घेणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, ती यादी आरोग्य केंद्रनिहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या नागरिकांना आता घरी जाऊन लसीकरण केले जाणार असल्याचे डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT