Aurangabad Vehicle accident traffic jam 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेफाटकाला पुन्हा वाहनाची धडक

वाहतुकीचा बोजवारा, संग्रामनगर उड्डाणपुलावर वाहतूक जाम, वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शिवाजीनगर रेल्वेफाटकाला पुन्हा वाहनाने बुधवारी (ता. सहा) सात वाजेच्या सुमारास धडक दिली. यामुळे रेल्वेफाटक नादुरुस्त झाल्याने सातारा, देवळाई आणि बीड बायपासकडे जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. संग्रामनगर उड्डाण पुलावर ट्राफिक जाम झाली, त्यातच पावसाची रिपरिप सुरु असल्याने वाहनधारकांना मार्ग काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. रात्रीचे १० वाजेनंतरही रेल्वेगेटच्या दुरुस्तीचे काम सुरूच होते.

जयपूर-नांदेड एक्स्प्रेस रवाना होण्यासाठी शिवाजीनगर रेल्वेगेट सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बंद करण्यात आले होते. याच वेळी एका मालवाहू वाहनाने गेटला धडक दिली. त्यामुळे गेट नादुरुस्त झाल्याने बंद पडले. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येक वाहनधारक रेल्वेगेटकडे जाण्यासाठी गेटपर्यंत पोहोचत होते; परंतु गेट बंद असल्याचे लक्षात येताच त्यांना माघारी फिरावे लागत होते. शिवाजीनगर येथेही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यानंतर जवळचा एकमेव मार्ग असलेल्या संग्रामनगर उड्डाणपुलावरही वाहतूक जाम झाली. रात्री उशिरापर्यंत गेटच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. पुलाच्या दोन्ही बाजूने आणि बीडबायपास रस्त्यावरही वाहनेच वाहने दिसत होते. वाहनांची कोंडी त्यातच पावसाची रिपरिप यामुळे मार्ग काढताना वाहनधारकांची दमछाक होत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT