Vinod Patil sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : सुपर न्युमरी पद्धतीने नियुक्त्यांचा मार्ग मोकळा

विनोद पाटील : आता कुणी खोडा घालू नये, अधिकाऱ्यांकडून सहकार्याची भूमिका

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठा समाजातील तरुणांना २०१४ ते २०२० या कालावधीत ज्या तरुणांना आरक्षणामधून नियुक्त्या मिळाल्या होत्या. मात्र, ते रुजू होऊ शकले नाहीत. या तरुणांसाठी आम्ही सातत्याने मागणी केल्यानंतर सरकारने सकारात्मकरीत्या सुपर न्युमरी पद्धतीने नियुक्त्या देण्याची घोषणा केली. शेवटी त्या तरुणांना समाविष्ट घेणार असल्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी रविवारी (ता.२८) पत्रकार परिषदेत दिली. आता यात कोणी खोडा घालू नये, असे आवाहनही पाटील यांनी केले.

विनोद पाटील यांनी सांगितले की, मोर्चा आणि बलिदानानंतर हे आरक्षण मिळाले होते, मात्र ते न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर प्रतीक्षेतील तरुणांसाठी सुपर न्युमरीची मागणी केली होती. मागील सरकारने निर्णय घेतला नाही. आता या सरकारने निर्णय घेतला. आता स्वत:च्या प्रसिद्धीसाठी सुपर न्युमरी पद्धतीला न्यायालयात आव्हान देऊन खोडा घालू नये, असे आवाहन त्यांनी केले.

जवळपास ४ हजार पेक्षा जास्त तरुण शासकीय नोकरीच्या नियुक्तीपासून वंचित असून, राज्य शासनाकडे मात्र, अकराशे जणांचीच यादी आली आहे. खालच्या अधिकाऱ्यांनीही माहिती पाठविली नाही, अधिकारी जाणीवपूर्वक सुपर न्युमरीच्या यादी पाठवत नाही. हे सरकारच्या व आमच्याही लक्षात आले आहे. कोषागार, आरटीओ विभागाने आकडेवारी दिली नाही. यात आमचा अंत पाहू नका अशी विनंती त्यांनी केली.

मराठा क्रांती मोर्चाला कोणाचेच नेतृत्व नाही

मुंबईतील बैठकीत संभाजीराजे छत्रपती यांना बोलू दिले नाही. तसेच त्यांचे नेतृत्व मान्य नसल्याचाही आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी केली. याविषयी विनोद पाटील म्हणाले, संभाजीराजे छत्रपती यांनी काय भूमिका घ्यायची, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते राजकारणी आहेत. आता त्यांनी संघटनाही काढली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर येऊन त्यांनी मागणी केलेली नाही. मराठा क्रांती मोर्चा म्हणून कुणाचेही कौतुक किंवा विरोध करण्याचा अधिकार नाही. कारण मराठा क्रांती मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मराठा क्रांती मोर्चाला कुणाचेच नेतृत्व नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा हेच आमचे नेतृत्व आहे. मोर्चाचे चेहरा समोर ठेवून पद मागणाऱ्यांना समाज कधीही माफ करणार नसल्याचेही विनोद पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT