students vaccination 
छत्रपती संभाजीनगर

दहावी-बारावी परीक्षा महिन्यावर, लसीकरण काठावर!

केवळ ३५ टक्के विद्यार्थ्यांना पहिला डोस; ६५ टक्के वंचित

संदीप लांडगे

औरंगाबाद : दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्याचे आदेश शिक्षण मंडळाने जानेवारी महिन्यात दिले होते. परंतू, महिनाभरात केवळ ३० ते ३५ टक्के विद्यार्थ्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे. अद्याप ७० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी म्हणजे एका महिन्यात सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे.

शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावीची परीक्षा १५ मार्चपासून तर बारावीची परीक्षा चार मार्चपासून सुरु होणार आहे. १४ आणि २५ फेब्रुवारीला दोन्ही वर्गाच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यात नऊ फेब्रुवारीपर्यंत २ लाख ६४ हजार ५११ विद्यार्थ्यांपैकी ७४ हजार ६८६ विद्यार्थ्यांना पहिला डोस दिला आहे. परीक्षेपूर्वी या विद्यार्थ्यांना लसीचा दुसरा डोसही मिळण्याची शक्यता आहे. मात्र, उर्वरित १ लाख ८९ हजार ८२५ विद्यार्थ्यांना अजून पहिलाही डोस मिळालेला नाही.

सुट्यांचा अडथळा

१५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण त्या-त्या शाळेतच केले जात आहे. परंतू, दर रविवारी शाळेला सुटी; तर शनिवार, रविवार आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सुटी असल्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवारीदेखील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरु ठेवावे. लसीकरण करत असताना नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांऐवजी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

  • २,६४,५११ - इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी

  • ७४,३१४ - दहावीचे एकूण विद्यार्थी

  • ७४,६८६ - पहिला डोस घेतलेले विद्यार्थी

  • ३०,३५६ - पहिला डोस घेतलेले विद्यार्थी

  • ५६,७७०- बारावीचे एकूण विद्यार्थी

  • १५,६२५ - लसीचा पहिला डोस घेतलेले विद्यार्थी

"आमच्या शाळेची विद्यार्थी संख्या जास्त असल्याचे कारण देत प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. वारंवार मागणी केल्यानंतर आमच्या शाळेतील नववी, दहावीच्या ८२५पैकी ४०३ विद्यार्थ्यांनाच पहिला डोस दिला आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांचे लसीकरण कधी होणार? लसीकरण नसल्यास त्यांना परीक्षेला बसू दिले जाईल का? असा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे."

-सुरेखा शिंदे, मुख्याध्यापिका, तनवाणी हायस्कूल तथा राज्याध्यक्ष, कायम विनानुदानित शाळा कृतीसमिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT