Aurangabad tourists vist Ajanta Caves 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : पर्यटकांनी बहरली अजिंठा लेणी

बस तिकिटासाठी रांगा : व्यावसायिकांना सुगीचे दिवस, सोयगाव आगाराकडून १३ बसची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

फर्दापूर - भारतीय स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त पर्यटन स्थळांवर दिलेला मोफत प्रवेश अन् त्यात आलेला रविवारची सुटी यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत एकाच दिवशी जवळपास पाच हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. यावेळी बस तिकिटांसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.

रविवारी सकाळपासूनच पर्यटकांची पाऊले लेणीकडे वळल्याचे दिसून आले. दुपारनंतर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता. येथे बसच्या तिकिटासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. शुक्रवारपासून अजिंठा लेणीत पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे रविवारी अजिंठा लेणीत मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते.

रविवारी पर्यटकांच्या गर्दीने टी पॉइंट व अजिंठा लेणी परिसरात जिकडे -तिकडे पर्यटक दिसून आले, तर अनेक पर्यटकांनी फर्दापूर टी पॉइंट ते अजिंठा लेणी आणि व्ह्यू पॉइंट ते अजिंठा लेणी असा पायी प्रवास केला. पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील वाहनतळ पूर्णपणे फूल झाले होते. पर्यटकांच्या सोयीसाठी सोयगाव आगाराने अजिंठा लेणीत १३ बस, १३ चालक आणि ८ वाहकांचे नियोजन केल्याने पर्यटकांना लेणीपर्यंत पोचला आले.

दरम्यान, १५ ऑगस्ट पर्यंत अजिंठा लेणीत पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जाणार असल्याने सध्या येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे येथे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या नागरिकांना सुगीचे दिवस आले आहे. लेणीत सध्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता फर्दापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT