लसीकरण sakal media
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : लसीकरण कमी असेल तर डॉक्टरांवर गुन्हे

जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सूचना

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर लावण्यात आले होते, त्यांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी.

तसेच ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करा, ज्या भागात लसीकरण कमी आहे, तेथील डॉक्टरावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी (ता. ३१) आढावा बैठकीत सांगितले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सोमवारी पार पडली. ज्या भागात लसीकरण कमी आहे त्या भागातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे देखील दाखल करण्यात येतील. ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल’ अंतर्गत ज्या भागात लसीकरण कमी आहे त्या भागात वाहने नेण्यात यावे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर लावण्यात आले होते अशा रुग्णांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात यावी.

हा गट अशा रुग्णांपैकी किती रुग्णांनी पहिला, दुसरा डोस घेतला होता तसेच किती रुग्णांनी एकही डोस घेतला नाही अशा रुग्णांचा अभ्यास करेल असेही जिल्हाधिकारी म्हणाले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, पोलिस उपायुक्त उज्वला बनकर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सुधाकर शेळके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT