Aurangabad Young man commits suicide with sorry brothers whatsapp status
Aurangabad Young man commits suicide with sorry brothers whatsapp status sakal
छत्रपती संभाजीनगर

‘सॉरी भावांनो’ स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

शिऊर : व्हॉटस्ॲप या सोशल मीडियावर ‘सॉरी भावांनो’ असा स्टेटस ठेवून २१ वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला शिऊर (ता.वैजापूर) येथे घडली.

ज्ञानेश्वर कैलास चव्हाण (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान ज्ञानेश्वर हा घरात कुणाला काही न सांगता घराबाहेर पडला होता. तो थेट स्व तः च्या शेतात गेला. येथे त्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यापूर्वी त्याने व्हॉटस्ॲपवर ‘सॉरी भावांनो’ असा स्टेटस ठेवले होते. त्याचे स्टेटस पाहून कुटुंबीयासह ग्रामस्थांनी त्याचा गावात शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. यानंतर काहींनी शेतात धाव घेतली असता दरम्यान,त्याचा मृतदेह शेतात लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहावर शिऊरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून शिऊर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामचंद्र जाधव हे करीत आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सदर तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तरी तो गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्याच्या मित्र, परिवाराने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT