छत्रपती संभाजीनगर

बॅडमिंटन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण

CD
बॅडमिंटन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण हिंगोली, ता. १३ (बातमीदार) : शहराजवळील लिंबाळा (मक्ता) भागातील जिल्हा क्रीडा संकुलात २७ व २८ फेब्रुवारी २०२७ ला बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी (ता. १३) कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे अनावरण केले. जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी, बॅडमिंटन खेळाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी आणि तरुणांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, या उद्देशाने अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ व २८ फेब्रुवारी २०२७ रोजी लिंबाळा (मक्ता) भागातील जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये विविध गटांमध्ये सामने आयोजित करण्यात येणार असून, विजेत्या खेळाडूंना आकर्षक रोख पारितोषिके आणि प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत देशभरातून नामवंत खेळाडू हजेरी लावणार आहेत. स्पर्धेच्या लोगोचे अनावरण आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जगजितराज खुराणा, सेवानिवतृत्त अभियंता अशोक अग्रवाल, सुरेश सराफ, सुनील देवडा, मनोज आखरे, जीतसिंग साहू, डाॅ. शिवाजी गिते आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अशोक अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचलन दीपक नयनवाणी यांनी केले तर आभार सुमित चौधरी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Merger Politics : "भाजपला दूर ठेवून आम्ही पुढे कसे जाणार?"; दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणातील सर्वात मोठा पेच उघड!

मायक्रोसॉफ्टच्या सेवा ठप्प होताच २०२४ च्या 'त्या' घटनेची आठवण; एका अपडेटनं जगभर उडवला होता गोंधळ

Latest Marathi News Live Update: मेहत्रे वस्ती येथील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

IND vs NZ, 4th ODI: विराट, रोहित, श्रेयस यांना पहिल्याच ओव्हरमध्ये कसं आऊट केलं? मॅट हेन्री म्हणाला, 'हे खूप मजेदार होतं...'

SCROLL FOR NEXT