छत्रपती संभाजीनगर

गुरुवारपासून पाच तास सुरू राहणार बँका 

प्रकाश बनकर

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत, जिल्हा प्रशासनाने  गेल्या सहा दिवसापासून शहरातील सर्व बँक बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता गुरूवार(ता.२१) बँका सुरू होणार आहे. सकाळी आठ ते दुपारी एक यावेळत बँका सुरू राहतील, अशी माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी बुधवारी(ता.२०) दिली.

 कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्व तर आजचे प्रयत्न करत आहे. मात्र नागरिक लॉक डाऊन मोडत आहे. यामुळे १५ ते १७  आणि १८ ते २० मे दरम्यान  रात्री बारा वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. शहरातील सर्व बँका बुधवारपर्यंत बंद होत्या.

याच दरम्यान एटीएमवर पुरेशी रकमेची सुविधा करून देण्यात आली होती.  सर्व ऑनलाईन बँकिंगच्या सुविधा या सुरू राहणार आहेत. या सुविधा सुरळीत राहावी यासाठी सर्व बँकांचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यरत होते.असेही  श्रीकांत कारेगावकर यांनी सांगितले.

कँटोन्मेंट झोनमधील बँकांच्या शाखा बंद

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यानुसार कोरोना प्रभाव असलेल्या भागातील बँकाच्या शाखा ३१ मेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या १५ हुन अधिक शाखा बंद ठेवण्यात आल्या आहेत. बंद असलेल्या शाखांमधील कर्मचारी हे इतर शाखांमध्ये पाठवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT