sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh.Sambhaji Nagar :लग्न समारंभात सावधान

शहरात तीन घटनांत ११ लाखांचा ऐवज लांबवला

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सध्या लग्नसराई सुरू आहे. ही संधी साधत चोरांनी मंगल कार्यालय, हॉटेल येथील समारंभांना लक्ष्य केले. विविध तीन घटनांत चोरांनी दागिने आणि रोख रकमेच्या पर्स लांबवल्या. या घटना जालना रोड येथील औरंगाबाद जिमखाना, हॉटेल रामा इंटरनॅशनल आणि बीड बायपास येथील नंदिनी हॉटेल मध्ये घडलेल्या. यात एकूण ११ लाखांचा ऐवज लांबवला.

खुर्चीवर ठेवलेली दागिन्यांची पर्स लंपास

रविवारी (ता. तीन) सायंकाळी जालना रोडवरील औरंगाबाद जिमखाना येथे जैस्वाल परिवाराचे रिसेप्शन होते. यासाठी मुंबईवरून हेमंतकुमार जैस्वाल आणि त्यांच्या पत्नी आशा जैस्वाल आल्या होत्या. आशा जैस्वाल यांनी त्यांची दागिने व रोख रक्कम असलेली बॅग खुर्चीत ठेवली. चोरांनी ही बॅग चोरून नेली. यामध्ये सोन्याचा नेकलेस, अंगठ्या, मंगळसूत्र, मोबाइल आणि रोख ५ हजार असा ५ लाख २५ हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी सुनील जैस्वाल यांच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद झाला. पीएसआय घुगे तपास करीत आहे.

तरुणी काढत होती फोटो, चोराने साधली संधी

पर्स चोरीची दुसरी घटना रविवारी रात्री १० वाजता जालना रोडवरील हॉटेल रामा इंटरनॅशनलच्या मागील लॉनमध्ये घडली. या ठिकाणी असलेल्या समारंभात दीपक रणजितसिंह कदमबांडे यांची भाची पैशाची पर्स खुर्चीवर ठेवून फोटो काढत होती. फोटो काढण्यात ती गुंग झालेली असल्याचे पाहून चोरट्याने ही पर्स लंपास केली. यामध्ये बंद पाकिटात भेट दिलेली अंदाजे साडेतीन लाखांची रक्कम होती. या प्रकरणी कदमबांडे यांच्या तक्रारी वरून सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. पीएसआय अमोल म्हस्के तपास करीत आहेत.

नजर हटताच लांबविली आहेराची रक्कम

लग्नाच्या रिसेप्शनमधून पर्स चोरीची तिसरी घटना १ डिसेंबरला सायंकाळी बीड बायपास भागातील नंदिनी हॉटेल येथे घडली. या ठिकाणी उमेश सुभाष खुरपे यांचे रिसेप्शन होते. यावेळी प्रमिला सुभाष खुरपे यांच्याकडे आहेराची पाकिटे असलेली पर्स होती. या पर्समध्ये दागिने आणि रोख रक्कम असा सव्वा दोन लाखांचा ऐवज होता. प्रमिला खुरपे यांची नजर चुकवून चोराने ही पर्स लंपास केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला. संशयित आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅँट घातलेली आहे. या प्रकरणी सौरभ सुभाष खुरपे यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT