Beed Accident News esakal
छत्रपती संभाजीनगर

जेवणानंतर दारासमोर उभ्या राहिलेल्या सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले

रोहिणी ही नर्सिंगचे शिक्षण घेत होती, तर मोहिनी एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती.

सकाळ वृत्तसेवा

पाटोदा (जि.बीड) : जेवण करुन दारासमोर उभ्या सख्ख्या बहिणींना भरधाव स्कॉर्पिओ जीपने जोराची धडक दिली. यात दोन्ही बहिणी गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्या. ही दुर्दैवी घटना रविवारी (ता.१९) रात्री तालुक्यातील धनगर जवळका येथे घडली. रोहिणी महारुद्र गाडेकर (वय वय २६) व मोहिणी महारुद्र गाडेकर (वय २२) अशी अपघातात ठार झालेल्या बहिणींची नावे आहेत. रोहिणी व मोहिनी गाडेकर या दोघी बहिणी आपल्या धनगर जवळका या गावी आल्या होत्या. रोहिणी ही नर्सिंगचे (Beed) शिक्षण घेत आहे. तर मोहिनी एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. या दोघी बहिणी रात्री जेवण केल्यानंतर दारासमोर उभ्या राहिल्या. (Beed Accident Two Sisters Died In Accident Patoda)

भरधाव वेगात आलेली जीप (एमएच १२ एमआर ९११३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने दोघींना जोराची धडक दिली. यात दोघी गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्या. जीप चालकाने पुढे जाऊन अन्य एकास धडक दिली. त्यानंतर चालक फरार झाला. पाटोदा पोलिसांनी सदरील जीप ताब्यात घेतली आहे. दोघी बहिणींच्या मृतदेहांची बीड जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT