Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादमध्ये रंगतेय आगळ्या-वेगळ्या बर्थडेची चर्चा

हा वाढदिवस राजकीय नेता किंवा कार्यकर्त्याचा नव्हता, तर तो होता, झाडांचा. वर्षभरापूर्वी लावलेल्या घनदाट जंगलातील झाडांचा

संदीप लांडगे

हा वाढदिवस राजकीय नेता किंवा कार्यकर्त्याचा नव्हता, तर तो होता, झाडांचा. वर्षभरापूर्वी लावलेल्या घनदाट जंगलातील झाडांचा

औरंगाबाद: मंडप सजला, फुलांची आरास,रांगोळी सजल्या, सजावटही झाली, केकही आला, औक्षण करायचे ताटही भरले, मित्रमंडळी,पाहुणे-रावळेही जमा झाले अन धूमधडाक्यात मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा झाला. पण हा वाढदिवस राजकीय नेता किंवा कार्यकर्त्याचा नव्हता, तर तो होता, झाडांचा. वर्षभरापूर्वी लावलेल्या घनदाट जंगलातील झाडांचा. दरवर्षी वृक्षसंवर्धन दिनाला सगळीकडेच वृक्षलागवडीचे कार्यक्रम होतात. अशा पद्धतीने वृक्षारोपणानंतर वृक्ष संगोपन व संवर्धनही गरजेचे असते. वृक्षसंवर्धनाबाबत सामाजिक संदेश देण्यासाठी बुधवारी (ता.२५) ब्रम्हगव्हाण (ता.पैठण) जिल्हा परीषद शाळेत थेट झाडांचाच पहिला वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषद, वन विभाग, इकोसत्व, ग्राइंड मास्टर, व कारपे आदी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्रह्मगव्हाण व नदीकाठ वस्तीशाळा अशा दोन्ही ठिकाणी मागील वर्षी प्रत्येकी दोन हजार चौरस फुटांत सहाशेपेक्षा अधिक देशी वनस्पतींची मियावाकी घनवन पद्धतीने लागवड करण्यात आली होती. या विशिष्ट तांत्रिक पद्धतीने लागवड झाल्याने व यशस्वीरीत्या संगोपन झाल्याने एका वर्षात झाडांची उंची २० फुटांपर्यंत पोहोचली असून त्याचे घनदाट जंगल तयार झाले आहे.

यावाढदिवस कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्रीराम केदार, शिक्षण विस्ताराधिकारी अनिल पुदाट, इकोसत्व व कारपे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नताशा झरिन, महेश सहस्रबुद्धे, शिक्षक सेनेचे अमोल एरंडे, अमोलराज शेळके यांच्यासह लोहगाव केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक महेश लबडे यांनी केले. प्रास्ताविक कैलास मिसाळ यांनी केले. मनोजकुमार सरग यांनी आभार मानले.

झाडांसाठीही सजला सेंद्रिय खतांचा केक-
वाढदिवस हा झाडांचा असल्याने त्यांनाही आनंदाने खाता आला पाहिजे, असा सेंद्रिय खतांचा केक सहशिक्षक रवी केदारे यांनी बनविला. हा केक पाहुण्यांमध्ये कौतुकाचा विषय ठरला. झाडांप्रती शिक्षकांमध्ये असलेली संवेदनशीलता व आत्मीयता यातून प्रतीत झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Washim News : 'तू खूप सुंदर दिसतो, तू खूप गोड आहे' म्हणत जवळ घेतलं अन्...; शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

Smriti Mandhana Marriage : क्रिकेटर स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका; एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं, नेमकं काय घडलं?

Periods & School Hygiene : आकस्मिक ‘पिरेडस्‌’ आणि तिची घालमेल, शाळांमध्ये सॅनिटरी पॅड असणे कितपत गरजेचं?

Latest Marathi News Live Update: : अहमदपूर नगरपालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीचा भव्य शक्तिप्रदर्शनासह प्रचाराचा दमदार शुभारंभ

Nagpur: विज्ञान संस्कृती रुजविण्यासाठी नितीन गडकरींचा पुढाकार; विज्ञानाभिमुख कार्यासाठी संस्थेची स्थापना, ६० कोटींची तरतूद करणार

SCROLL FOR NEXT