छत्रपती संभाजीनगर

पीककर्जासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांचा ठाम पाठपुरावा; मानवत येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील प्रलंबित प्रकरणे मार्गी

CD
बँक ऑफ बडोदा शाखेतील प्रलंबित प्रकरणे लागली मार्गी -------- मानवतला पीक कर्जासाठी भाजपचा पाठपुरावा मानवत, ता.१३ (बातमीदार ): रब्बी हंगामाच्या पेरणीचा काळ जवळ आल्याने शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळणे आवश्यक आहे. मात्र, काही बँकांकडून तांत्रिक कारणे, गॅरंटरच्या अडचणी पुढे करून कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मानवत येथील बँक ऑफ बडोदा शाखेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत प्रलंबित पीककर्ज प्रकरणे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर धोपटे यांनी बँक प्रशासनाची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रलंबित कर्जप्रकरणांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी काही शेतकऱ्यांच्या कर्जफाइल गॅरंटर तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे रखडल्याचे समोर आले. संबंधित सर्व प्रकरणांचा तातडीने निपटारा करून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या आवश्यक सह्या घेण्यापासून त्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रंगनाथ सोळंके, ज्ञानेश्वर धोपटे आणि संबंधित शेतकरी बँकेतच थांबून राहिले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर प्रलंबित कर्जप्रकरणे मार्गी लागली आणि संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी ज्ञानेश्वर धोपटे म्हणाले की, रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कर्जप्रकरणांत अनावश्यक दिरंगाई होऊ नये. बँक प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणे हिच आमची भूमिका आहे. यावेळी रंगनाथ सोळंके, ज्ञानेश्वर धोपटे, माणिकराव मोगरे, मंगेश धोपटे, सुरेश धोपटे, महेश धोपटे, अनिल चौधरी, युवराज धोपटे, सिद्धेश्वर आरसूल, नवनाथ आरसूल, अशोक धोपटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून समस्या सोडविण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचा निर्धार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कापसाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांसमोर नवे संकट; बाजारात पाचशे ते साडे पाचशे कमी दराने कापसाची विक्री

IND vs NZ 4th ODI: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Unplayable Deliveries असं काही नसतं, फलंदाजानं...; ८९ ऑल आऊटनंतर गौतम गंभीरकडून कानउघडणी

SCROLL FOR NEXT