chandrashekhar bawankule Marathi news sakal
छत्रपती संभाजीनगर

Dharashiv News : तुळजापूरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने दाखविले काळे झेंडे

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना बुधवारी ता.6 मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखविले.

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना बुधवारी ता.6 मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकत्यांनी काळे झेंडे दाखविले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे हे तुळजाभवानी मातेच्या दश॔नासाठी जात होते यावेळी सदरचा प्रकार घडला. भवानी रस्त्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे निवडक कार्यकर्ते आले.

त्यांनी श्री बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविण्यास सुरूवात केली. तसेच निषेध व्यक्त केला, एक मराठा लाख मराठा , आरक्षण आमच्या हक्काचे , मराठा समाजास 50 % च्या आतमध्ये समाविष्ट करून मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून मोठी घोषणाबाजी करण्यात आली.

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकत्यांनी गनिमी काव्याने निद॔शने केल्यामुळे पोलीस प्रशासनाची हि ऐनवेळी पळापळी झाली. सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन श्री बावनकुळे मार्गस्थ झाल्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले.

यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महेश गवळी, अजय साळुंके , अर्जुन साळुंके, कुमार टोले, सुदर्शन वाघमारे, विकास वाघमारे, वैजनाथ सुरवसे, उमेश जाधव, सत्यजीत साठे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT