औरंगाबाद : ‘बोल सदानंदाचा’, येळकोट येळकोट ‘जय मल्हार’
औरंगाबाद : ‘बोल सदानंदाचा’, येळकोट येळकोट ‘जय मल्हार’ sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : ‘बोल सदानंदाचा’, येळकोट येळकोट ‘जय मल्हार’

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद : बोल खंडेराव महाराज की जय ॥ सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय मल्हार ॥ हर हर महादेव ॥ चिंतामणी मोरया ॥ या जयघोषात गुरुवारपासून प्रतिजेजुरी अर्थात साताऱ्यात चंपाषष्ठीला बेल-भंडारा उधळत उत्साहात सुरुवात झाली. यावेळी श्रीखंडोबाची पालखी साध्या पद्धतीने जहागीरदार-दांडेकर वाड्यात नेण्यात आली.

चंपाषष्ठीला मार्तंडभैरवोत्थापन होत असून गुरुवारपासून (ता.९) खंडोबा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली. सातारा येथील खंडोबा मंदिरात सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या प्रमुख उपस्थितीत खंडोबा देवाची विधिवत पूजा करून तळी उचलण्यात आली. यावेळी बेलभंडाराची मुक्तपणे उधळण करून भक्तांना गूळ-खोबऱ्याचा प्रसाद वाटण्यात आला. श्रीखंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने भंडारा करण्यात आला. यात भक्तांसाठी वांग्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचे येथे प्रसाद रुपी भोजन देण्यात आले. असंख्य भक्तांनी त्याचा लाभ घेतल्याचे श्रीखंडोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष साहेबराव पळसकर व सचिव गंगाधर पारखे यांनी सांगितले.

दरम्यान, मंदिर परिसरात बाहेरची कोणतीही खाऊ-खेळणीची दुकाने लागली नसली तरी नेहमीची पूजा साहित्याची दुकाने थाटली आहेत. गुरूवारी सकाळी ७ वाजेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रांग लागली होती. दुपारनंतर ही रांग मंदिराबाहेर पोहोचली होती. हळदीचा बेलभाडांर, रेवड्यांची उधळण करीत ‘यळकोट यळकोट जयमल्हार’च्या जय घोषात भाविक दर्शन घेत होते. चंपाषष्ठी महोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मोहन काळे, दिलीप दांडेकर, विठ्ठल देवकर, गोविंद चोपडे, रमेश चोपडे, लक्ष्मण चोपडे, श्रीधर झरेकर, लक्ष्मण सोलट, सोमीनाथ शिराणे, गणेश खोरे, सुभाष पारखे, मोहन पवार, सुखदेव बनगर, विजय धुमाळ, सिंधूताई धुमाळ परिश्रम घेत आहे.

निर्बंधामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण

देवदिवाळीला मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरव खंडोबा उत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी निर्बंध असून, त्यामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे यात्रा सुनीसुनी वाटत आहे. दरम्यान, सकाळच्या महाआरतीनंतर मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत वीणेच्या तारा छेडत श्रीखंडोबाची पालखी जहागीरदार (दांडेकर) वाड्यात पोहोचली. सायंकाळी पुन्हा पालखी मुख्य मंदिरात आली.

मंदिर परिसरात लसीकरण

शहरातील भक्तांनी दर्शनासाठी साताऱ्यात धाव घेतली असली तरी कोरोनामुळे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली टप्प्या-टप्प्याने भक्तांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. पंचवीस, पन्नास अशा गटाने भक्तांना दर्शनाला सोडण्यात आले. भक्तांना मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी सक्तीचे करण्यात आले असून, बाजूलाच महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहीम आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

पाच ठिकाणी पोलिस राहुट्या

सातारा परिसरात यात्रा भरली नसली तरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाच ठिकाणी पोलिसांच्या राहुट्या उभारण्यात आल्या आहेत. दरम्यान शनिवार-रविवार सुट्टी असल्यामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि विश्वस्त प्रयत्नशील आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT