
दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरून जैन बांधव आक्रमक झाले होते. बंद केलेला कबुतर खाना सुरू करण्यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं. पण उच्च न्यायालयाने कबुतर खाना परिसरात कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता येणार नाही हा निर्णय कायम ठेवण्यात आला. यानंतर कबुतरांना धान्य घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसुद्धा केली जात आहे. तरीही कबुतरांना खाद्य घालण्यासाठी एका व्यक्तीने चक्क कारच्या छतावर ट्रे बसवून त्यात धान्य टाकलं होतं. ती कार कबुतरखाना परिसरात लावली होती. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आलीय. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.