Broiler Chicken price
Broiler Chicken price sakal
छत्रपती संभाजीनगर

चिकनची चव महागली; दर पोचले २४० रुपये प्रतिकिलोवर

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महागाईची झळ आता चिकनलासुद्धा बसली असून दर पुन्हा एकदा २४० रुपये प्रती किलोवर गेले आहे. पूर्वी हे दर १८० ते २०० रुपये किलोपर्यंत होते. पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य, वाहतूक, पक्षांच्या वाढलेल्या किंमतीमुळे चिकनचे दर वाढले आहेत. याचा फटका, ग्राहकांसह हॉटेल चालकांना बसला आहे.

लॉकडाऊनमध्ये चिकनच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. आता पुन्हा दर प्रत्येक आठवड्याला वाढत आहेत. पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्य महाग झाल्याने चिकनच्या दरात वाढ झाली आहे. सध्या पोल्ट्रीसाठी एक पक्षी ४१ रुपयांपर्यंत येतो. तर त्यांना लागणारे खाद्य हे ३ हजार ३०० रुपयांच्या पुढे गेले आहे.(Broiler Chicken price)

पक्षांच्या सांभाळ करण्यास १०० ते १०५ रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे पोल्टी चालक हे चिकन विक्रेत्यांना जिवंत कोंबडी १५० रुपये दराने विक्री करत आहे. त्यामुळे ग्राहकांना चिकन २४० रुपये प्रती किलो खरेदी करावे लागते. तसेच ग्राहकांनी जिवंत कोंबडी खरेदी केल्यास ती १५० रुपये किलो आहे. चिकनचे दर वाढल्याने सध्या विक्रीत घट झाली आहे. शिवाय हॉटेल चालकांना महाग चिकन घेऊन पूर्वी आहे त्या किंमतीत चिकनचे पदार्थ विक्री करावे लागत आहे.

गावरान चिकन ५०० रुपये किलो

सध्या चिकन विक्रेत्यांकडे गावरान जिवंत कोंबडा ५०० रुपये किलो दराने मिळत आहे. तर यामध्ये डुप्लीकेट गावरन म्हणून ओळखले जाणारे कोंबडे हे २८० रुपये किलो झाले आहे. मात्र याला सुद्धा ग्राहकी नसून विक्री खूप कमी झाल्याचे मध्यवर्ती जकात नाका येथील विक्रेते बाबूभाई यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT