sambhaji nagar
sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : खैरे-दानवेंचे मनोमिलन?

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेत माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील गटबाजी जगजाहीर आहे. मात्र, काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांत खैरे हे दानवे यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शुक्रवारी याचा प्रत्यय आला.

अंबादास दानवे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या व्हॅनिटी व्हॅनचे उद्‍घाटन खैरे यांच्या हस्ते करून हात पुढे केल्याचे चित्र पहायला मिळाले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम खेळीमेळीत झाला. त्यामुळे खरेच दोघांमध्ये मनोमिलन झाले का? असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंबादास दानवे यांनी व्हॅनिटी व्हॅन तयार केली आहे. लोकसभेची निवडणूक आगामी फेब्रुवारीत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षातर्फे हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे देखील बैठकांचे सत्र सुरू आहे.

त्याअनुषंगाने आता व्हॅनिटी व्हॅन तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात अंबादास दानवे यांनी सांगितले, की अनेकवेळा ग्रामीण भागात आवश्यक प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे निवडणुकीच्या धावपळीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी ही व्हॅन तयार करण्यात आली आहे. विनायक पांडे, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, तालुका प्रमुख आनंद पाटील, नितीन पवार, हरिभाऊ हिवाळे, गणेश लोखंडे, प्रमोद ठेंगडे, अनिल लहाने, चंद्रकांत इंगळे, सुगंधकुमार गडवे, शिवा लुंगारे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: मुंबईतील मतदान केंद्रांवर सुविधा नाहीत; आदित्य ठाकरेंनी व्हिडिओद्वारे मांडली समस्या

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT