sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : ‘अभाविप’ कार्यकर्त्यांना मारहाण; महापुरुषांच्या नावांच्या फलकाचे विद्रूपीकरण केल्याचा आरोप

महापुरुषांच्या नावांच्या फलकावर अभाविपचे नाव लिहून विद्रूपीकरण केल्याची तक्रार करूनही काहीच कारवाई झाली नाही.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही भिंतींवर, तसेच ‘महात्मा फुले-डॉ.आंबेडकर विचारधारा व संशोधन केंद्र’ या नावाच्या पाटीवरही ‘जॉइन एबीव्हीपी’ असे लिहिण्यात आले. त्यामुळे महापुरुषांच्या फलकाचे विद्रुपीकरण झाल्याचा आरोप करीत आंबेडकरी संघटना आणि एबीव्हीपी या दोन संघटना मंगळवारी (ता. १७) एकमेकांना भिडल्या. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांना मारहाण करून त्यांना प्रशासकीय इमारतीसमोरील उपाहारगृहातून हाकलून लावण्यात आले.

महापुरुषांच्या नावांच्या फलकावर अभाविपचे नाव लिहून विद्रूपीकरण केल्याची तक्रार करूनही काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ प्रतिक्रिया म्हणून अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे आंबेडकरी चळवळीतील काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान,

विद्यापीठात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त संपतराव शिंदे, बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक तायडे आदींनी भेट घेऊन घटनेचा आढावा घेतला.रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन बहुजन सेना, सम्यक विद्यार्थी आंदोलन आदी संघटनेती

पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठातील महापुरुषांच्या विचारधारा व संशोधन केंद्राच्या फलकावर एबीव्हीपी लिहिल्याच्या निषेधार्थ जाब विचारला. त्यानंतर अभाविपच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. विद्यापीठात ठिकठिकाणी जॉइन एबीव्हीपी असे लिहिलेले असून, त्यामध्ये प्राध्यापकांसाठीच्या वाहनतळाच्या जागांचाही समावेश असल्याचे आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी सांगितले.

अभाविपकडून होत असलेल्या प्रकाराविषयी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन माहितीही दिलेली आहे. बेगमपुरा पोलिस ठाण्याला यासंदर्भाने तक्रार दोन दिवसांपूर्वी मिळाली होती, असे पोलिस निरीक्षक तायडे यांनी सांगितले. मात्र, दोन दिवसांत अभाविपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही.

कुलसचिवांचे तोंडावर बोट

घडलेल्या घटनेवर विद्यापीठाने काही कार्यवाही केली का हे जाणून घेण्यासाठी कुलसचिव डॉ. भगवानराव साखळे यांच्याशी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी हृषीकेश केकाण यांच्याशीही अनेकवेळा संपर्क केला. मात्र, त्यांनीही माहिती घेऊन सांगतो म्हणून नंतर कुठलाही प्रतिसाद दिला नाही. विद्यापीठ व अभाविपचे या घटनेवर मौनच राखल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी (ता.१८) आंबेडकरी संघटनांतर्फे विद्यापीठ बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT