sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : खा. इम्तियाज जलील यांच्या पुतळ्यास भरल्या बांगड्या

नारीशक्ती वंदन विधेयकावरून भाजप महिला मोर्चाचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - संसदेत महिला विधेयकाविरोधात मतदान करणाऱ्या एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप महिला मोर्चातर्फे रविवारी क्रांती चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. आक्रमक महिलांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या पुतळ्यास बांगड्या भरल्या.

भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अमृता पालोदकर, माधुरी अदवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने सादर केलेल्या ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक प्रचंड बहुमताने संमत झाले. परंतु विरोधात दोन मते पडली.

त्यामध्ये खासदार इम्तियाज जलील यांचा समावेश होता. त्यामुळे महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. खासदार इम्तियाज यांच्याविरोधात घोषणा देवून तसेच त्यांच्या पुतळ्याला बांगड्या घालून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनास श्री. बोराळकर, भाजप प्रदेश सरचिटणीस मीना मिसाळ, शालिनी बुंधे, लता दलाल, वर्षा साळुंके, वंदना शहा, गीता कापुरे, गीता आचार्य, मीना खरे,

उज्ज्वला दहिफळे, सुप्रिया चव्हाण, मनिषा मुंडे, पूजा सोनवणे, जयश्री दाभाडे, सुवर्णा धानोरकर, रेखा जैस्वाल, मीरा काळे, प्रतिभा जऱ्हाड, जान्हवी पाटील, रुपाली धर्माधिकारी, अपर्णा चौबे, पुनम राजपूत, हाफीज शेख, लक्ष्मीकांत थिटे, कुणाल मराठे, सिद्धार्थ साळवे, प्रवीण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

SCROLL FOR NEXT