Chh. Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : बहिणीच्या अपहरणाचा जाब विचारणाऱ्या भावावर गोळीबार

गोळीबाराच्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

सकाळ वृत्तसेवा

वाळूज महानगर - बहिणीच्या अपहरणावरून जाब विचारणाऱ्या भावावर दुकानात घुसून गोळीबार केल्याची घटना औरंगाबदेत घडली. रात्री साडे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं औरंगाबादमध्ये खळबळ उडाली असून वाळूज परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी गृहखातं पावलं उचलणार का असा सवाल स्थानिक विचारत आहे.

रांजणगाव (शेणपुजी) येथे राहणाऱ्या २२ वर्षांच्या तरुणाच्या चुलत बहिणीचे अपहरण झाले आहे. नाशिकमध्ये राहणाऱ्या श्रावण पिंपळे याने अपहरण केल्याचा संशय आहे. यावरुन संबंधित तरुणाने आरोपी श्रावणला फोन केला होता. फोनवरील संभाषणादरम्यान दोघांमध्ये खटके उडाले होते.

मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास श्रावण आणि त्याचा साथीदार गावठी कट्टा घेऊन संबंधित तरुणाच्या घरी पोहोचले. श्रावणला पाहताच तरुणाने घराबाहेरील दुकानाचं शटर बंद केले. मात्र, श्रावणे झाडलेली गोळी शटरमधून घुसून तरुणाच्या गुडघ्याला लागली.

गोळीबाराच्या या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी श्रावण पिंगळे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दा खल करण्यात आला आहे.

आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना

पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधार्थ पथक रवाने झाले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पागोट करीत आहे.

गृहमंत्री दखल घेणार का?

वाळूज परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला काही भ्रष्ट पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी विधिमंडळात केला होता.

याबाबत गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र खरोखरच गृहमंत्री वाळूज परिसरातील वाढत्या गुन्हेगारीची दखल घेतील का व भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT