crime sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : सासरच्यांनी विकले एक दिवसाचे बाळ; मातेची आत्महत्या सहा जणांवर गुन्हा, पतीला अटक

तुपे पाटील यांनी पोलिसांची बाजू मांडली. हर्सूल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील चव्हाण तपास करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - तिचे सध्याचे वय २६ वर्षे. अकरा वर्षांपूर्वी िववाह झाला. लग्नानंतर पाच ते सहा वर्षे सासरी चांगले वागविले. तिला दोन मुले आहेत. चार-पाच महिन्यांपूर्वी तिसरा मुलगा झाला. अर्भक केवळ एक दिवसाचे असतानाच पतीची बहीण (नणंद) आणि तिचा नवरा (नंदई) तिच्या माहेरी गेले. ‘तुझा मुलगा आजारी आहे,

दवाखान्यात घेऊन जातो’ असे तिला सांगितले. बळजबरीने मुलगा (अर्भक) घेऊन गेले. ती सासरी गेली तेव्हा तिला मुलगा मृत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोटच्या गोळ्याला विकल्याची माहिती नातेवाईकांकडून समजली. शेवटी तिने हाय खाल्ली आणि १७ ऑक्टोबरला शेतात गळफास घेतला.

हर्सूल (जि. संभाजीनगर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या या प्रकरणात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल झाला.हर्सूल पोलिसांनी संशयित पतीला अटक केली असून अनिल पूनमचंद राठोड (३५) असे त्याचे नाव आहे. सासरा पूनमचंद रामजी राठोड (५५), शेवंताबाई पूनमचंद राठोड (५०), कृष्णा पूनमचंद राठोड (३८)(रा. सर्व दुरगड तांडा), संगीता प्रकाश चव्हाण (३२, नणंद),

प्रकाश कवरसिंग चव्हाण (३८, नंदई, रा. मुकुंदवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. प्रियंका अनिल राठोड (२६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिच्या पतीला न्यायालयात हजर केले असता २० ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी वकील योगेश

तुपे पाटील यांनी पोलिसांची बाजू मांडली. हर्सूल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील चव्हाण तपास करीत आहेत.

सहा महिने पत्ताच लागू दिला नाही

सासरच्या मंडळींकडून प्रियंकाला सतत मानसिक, शारीरिक त्रास दिला जात होता. पोटच्या गोळ्याच्या शोधासाठी ती सासरी आली, मात्र सासरच्या मंडळींनी तिला बाळाची विक्री केल्याचा सहा महिने पत्ताच लागू दिला नाही! बाळाबाबत विचारले तर ठार मारुन टाकू, अशी धमकी तिला दिली जात होती.

दरम्यानच्या काळात तिचे खूप हाल झाले. सासरच्यांनी तिचं जगणे असह्य केल्याने प्रियंकाचा भाऊ विशाल चव्हाण याने हर्सूल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ‘बहिणीला सासरी सोडल्यानंतर १६ ऑक्टोबरला तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ‘तुझी बहीण कालपासून घरी नाही,

तिकडे आली आहे का’ अशी उलट विचारणा भावजी अनिल याने केली. त्यानंतर मी आणि मावसभाऊ, शेजारचा एकजण असे तिघे तिच्या सासरी गेलो. दरम्यान १७ ऑक्टोबरला सासरच्या घरासमोरील झाडाला प्रियंकाने गळफास घेतल्याचे समोर आले’, असे विशालने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

बाळ कधी, कोणाला विक्री केले?

मृत प्रियंका हिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीत, तिचे एक दिवसाचे बाळ विक्री केल्याचे नमूद केले आहे. मात्र तिच्या पतीने हे बाळ कोणाला विकले, हे मात्र समोर आले नाही. खरोखरच बाळाची विक्री केली का, केली असेल तर कोणाला, की कोणाला दिले,

दिले असेल तर कोणाला, बाळ कोणाला दिले असेल तर प्रियंकाने आत्महत्या का केली असावी आदी प्रश्नांभोवती पोलिस तपास सुरु आहे. काही ‘वेगळे’ प्रकरण तर नाही ना, यावर काम करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT