Chh. Sambhaji Nagar Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhaji Nagar : जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिला राजीनामा

अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात पत्रही दिले होते.

सकाळ डिजिटल टीम

Chh. Sambhaji Nagar - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील यांच्या कार्यशैली विषयी नाराज असलेल्या पंधराहून अधिक संचालकांनी राजीनामा द्या, अन्यथा अविश्‍वास प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला होता. या संदर्भात पत्रही दिले होते.

यानंतर मंगळवार (ता.१) अध्यक्ष नितीन पाटील यांनी बँकेचे व्यवस्थापक अजय मोटे यांच्याकडे राजीनामा पाठवला.

बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे २०१९ पासून आतापर्यंत अध्यक्ष होते. दरम्यान सोसायटी नोंदणी संदर्भात दोन दिवसापूर्वी संचालक आणि अध्यक्ष नितीन पाटील यांच्यात खडाजंगी झाली होती. याच वेळी अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार व संचालकांचे म्हणणे ऐकत नसल्याच्या तक्रारी अध्यक्षांच्या विरोधात होत्या.

यामुळे सर्वांनी अध्यक्षांना राजीनामा द्या अन्यथा अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी नितीन पाटील हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. दौऱ्याहुन परतल्याएनंतर मंगळवारी सकाळी घरूनच त्यांनी राजीनामा पाठवून दिला.

एका ओळीचा राजीनामा लिहून त्यांनी तो बँकेचे व्यवस्थापक अजय मोठे यांच्याकडे पाठवला आहेत या राजीनामात म्हटले आहे.

की ‘‘आज दिनांक एक ऑगस्ट २०२३ रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. छत्रपती संभाजीनगर बँकेच्या चेअरमन/ अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.’’ असे त्या पत्रात म्हटले आहे. हे पत्र हे कार्यकारी संचालक/ उपाध्यक्ष यांना पाठवले आहे.

अध्यक्ष नितीन पाटील यांनी राजीनामा द्यावा यासाठी अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह १५ संचालकांनी सुद्धा बँकेचे व्यवस्थापक अजय मोटे यांना पत्र दिले होते. या संदर्भात राजीनामा न दिल्यास पाच ऑगस्टला बैठक ठेवण्यात आली होती.

बँकेचे वाहन घेतले परत

नितीन पाटील हे सोमवारी नाशिक जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी गेले होते, ते पण शहरात परत आल्यानंतर सकाळी बँकेतर्फे त्यांच्याकडून बँकेचे वाहन परत घेण्यात आले. अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT